मदन कारंडेच्या प्रचाराचा तुळजाभवानी मंदिरात शुभारंभ
इचलकरंजी : येथील तुळजाभवानी मंदिर येथून महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे याचा प्रचार शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. येथे प्रमुख नेते च्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून प्रचाराला सुरुवात करण्यात आली. प्रचारादरम्यान , अनेकांनी बुके व शाल देऊन त्यांचे मनोबल वाढवत एक प्रकारे मोठा पाठिंबाच त्यांना मिळत असल्याचे यावेळी दिसून आले.
प्रचारादरम्यान, तरुणांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येत होता. विविध महिलांनी मदन कारंडे यांना आशीर्वाद दिले. तांबे माळ, बाळनगर ,कुडचे नगर, दातारमळा ,लंगोटे मळा व श्री प्रसाद नगर येथे प्रचाराची सांगता करण्यात आली. प्रचारादरम्यान विविध ठिकाणी मंदिरा भेट देऊन कारंडे यांनी आशीर्वाद घेतला. यावेळी मँचेस्टर आघाडीचे सागर चाळके, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सयाजी चव्हाण, काँग्रेसचे राहुल खंजिरे, नितीन कोकणे , माजी नगरसेवक राजवर्धन नाईक, प्रकाश मोरबाळे, अतुल शेळके, निखिल जमाले, सनी खारगे, राजू लायकर ,विवेक शेळके ,सुशांत कोटगी, तमन्ना कोटगी ,धनाजी मोरे त्यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800









