कोरोचीत मदन कारंडेंच्या प्रचाराचा शुभारंभ.
इचलकरंजी : कोरोची तालुका हातकणंगले येथे महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांचा प्रचार शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ग्रामदैवत मारुती मंदिर येथे महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे नेते शशांक बावचकर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुहास जांभळे,माजी जिल्हा परिषद सदस्य देवानंद कांबळे, आनंद शेट्टी, दीपक पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराला सुरुवात करण्यात आली. ग्रामदैवत मारुती मंदिर, गुरु महाराज मंदिर ,महालक्ष्मी मंदिर, विठ्ठल मंदिर येथे सांगता करण्यात आली. याप्रसंगी बोलताना कारंडे म्हणाले, ही विधानसभा निवडणूक धनशक्ती विरोधात जनशक्ती असून सर्वसामान्य मतदारांचा पाठिंबा महाविकास आघाडीला असल्याने मतदार माझ्या पाठीशी ठाम राहतील , असा विश्वास त्यांनी वेक्त केला. तसेच डोळ्यासमोर विधानसभा निवडणूक ठेवून साडेचार वर्ष विकास कामे न करता राहिलेल्या सहा महिन्यातच विकास कामे दाखवून जनतेसमोर आपणच विकास कामे केल्याचे सांगत मत मागण्याचे काम करत आहेत. कोरोची नगरीची जनता सुज्ञ असून येथील मतदार स्वच्छ व पारदर्शक उमेदवारालाच निवडून देऊन गावचा विकास साधेल असे बोलताना त्यांनी नमूद केले.
सदर प्रचार शुभारंभा वेळी ग्रामपंचायत सदस्य साहेब लाल शेख, संगीता शेट्टी, कोमल कांबळे, हलिमा सनदी, स्नेहल कोरोचीकर राजकुमार चावरे, आरती कुंभार,सतीश लोहार, दीपक पाटील, संजय माने, बाळासाहेब चव्हाण ,अमर कोरोचीकर,पोपट शिंदे, चंद्रकांत आवळे, रणजीत शिंदे ,अनिकेत देसाई , भाऊसो तलवार अरुण शेट्टी, आयुब सनदी , झुंबर तरंगे, अजित कडाले, जॉबर कांबळे, संजय शिंदे , प्रतीक चव्हाण ,विकास बनसोडे, इकबाल सनदी भीमराव कांबळे ,अनिल नाडे, राहुल पद्मन , विकास पाटील ,पार्श्व पाटील, दीप उपाध्ये बबलू कांबळे ,अजय सुतार, एकनाथ सूर्यवंशी अनिल वाघमारे,वंदना शिरसाट , मनिषा माने,यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नेते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







