मतदान केंद्र क्रमांक २५२ मधील मतदान केंद्र स्तरीय अधिकारी (B.L.O.) तथा महानगरपालिका लिपिक सुर्यकांत वाडकर निलंबित
इचलकरंजी
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची आचारसंहीता दि.१५ आक्टोंबर २०२४ पासून लागू झालेली आहे. निवडणूक अनुषंगिक कामकाज करणेकामी प्रत्येक मतदान केंद्रावर केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांची नियुक्ती करणेत आली आहे. मतदान केंद्र क्रमांक २५२ करीता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून सुर्यकांत वाडकर यांची नियुक्ती करणेत आलेली होती. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणुन श्री वाडकर आपली कर्तव्ये व जबाबदारी पार पाडत नसलेने प्रत्यक्ष निवडणूक कामकाजामध्ये अडथळा आल्याचे निदर्शनास आलेने निवडणूक निर्णय अधिकारी, २७९ इचलकरंजी विधानसभा मतदार संघ यांचे प्रस्तावानुसार सुर्यकांत वाडकर यांना दि.२२ ऑक्टोबर रोजी कारणे दाखवा नोटीस लागू करणेत आलेली होती. सदर कारणे दाखवा नोटीसीस वाडकर यांनी समाधान कारक उत्तर दिलेले नाही.
लोकसेवक म्हणून कार्यरत असताना कर्मचारी यांचे वर्तन हे महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील तरतूदीप्रमाणे असणे आवश्यक आहे. कर्तव्य बजावत असताना असे कृत्य घडणे ही बाब अंत्यत गंभीर असल्याने सुर्यकांत वाडकर यांनी या कृत्याद्वारे महाराष्ट्र नागरीसेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम ३ मधील तरतूदीचा भंग केला आहे.या गैरकसुरीबाबत श्री वाडकर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ मधील शिस्तभंगाचे कारवाईस पात्र असल्याने त्यांना महानगरपालिका सेवेतून निलंबित करणेत आलेले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







