ICHMH51NEWS.IN
9921600800

२७९ इचलकरंजी विधानसभा निवडणूक निरीक्षक विश्व मोहन शर्मा यांची इचलकरंजी विधानसभा मतदार संघाची  पाहणी.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

२७९ इचलकरंजी विधानसभा निवडणूक निरीक्षक विश्व मोहन शर्मा यांची इचलकरंजी विधानसभा मतदार संघाची  पाहणी.
इचलकरंजी
     सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २७९
विधानसभा मतदारसंघ निरीक्षक विश्व मोहन शर्मा यांनी निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले, सहा. निवडणुक निर्णय अधिकारी प्रसाद काटकर, सुनिल शेरखाने, नोडल अधिकारी महेंद्र क्षिरसागर यांच्या उपस्थितीत दि.०५  नोव्हेंबर रोजी २७९ इचलकरंजी विधानसभा मतदारसंघास भेट देऊन पाहणी केली.
  या अनुषंगाने निवडणूक कामी कार्यरत असलेल्या कबनुर नाका येथील एस.एस.टी. केंद्रास भेट देऊन पाहणी केली आणि सर्व दुचाकी, चारचाकी वाहने, ट्रक त्याचबरोबर शासकीय वाहने सुद्धा  काटेकोरपणे तपासणी करणे च्या सुचना दिल्या.
    शहरातील राजीव गांधी भवन येथे असलेल्या स्ट्रॉंग रूमची पाहणी करून सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या सुविधा उपाययोजना करणेच्या सूचना दिल्या. याच ठिकाणी मतमोजणी होणार असून त्या दृष्टीने आवश्यक असलेल्या व्यवस्थेची माहिती घेतली. तसेच या ठिकाणी मतदानाचे आदल्या दिवशी साहित्य वाटप आणि मतदाना दिवशी साहित्य जमा करणे च्या अनुषंगाने आवश्यक त्या सूचना दिल्या.
     याचबरोबर निवडणूक विषयक कामकाजासाठी नियुक्त सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी निवडणूक विषयक कामकाज प्रभावीपणे आणि काटेकोरपणे
करणेच्या सूचना दिल्या.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा