डीकेटीईचे ‘अंबर नियतकालिक‘ शिवाजी विद्यापीठात प्रथम
इचलकरंजी:
विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा व त्यांच्यातील सृजनशीलता वृध्दिंगत व्हावी, यासाठी डीकेटीईच्या टेक्स्टाईल ऍण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटसूटमध्ये प्रतिवर्षी ‘अंबर’ हे नियतकालिक प्रकाशित केले जाते. प्रतिवर्षी शिवाजी विद्यापीठ संलग्न महाविद्यालयीन नियतकालिका स्पर्धेचे आयोजन करते. २०२२-२३ या वर्षीच्या शिवाजी विद्यापीठातील सदर स्पर्धेत व्यावसायिक महाविद्यालये या गटातून डीकेटीईच्या ‘अंबर २०२३’ या नियतकालिकेस २०२३ सालचा ‘प्रथम‘ क्रमकांचा सर्वसाधारण विजेता पुरस्कार प्राप्त झाला आहे.
सदर पुरस्कार प्रदान सोहळयात शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देवून डीकेटीईचे अंबर संपादक आर.डी. शिर्के यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कारावेळी प्र. कुलगुरु डॉ. पी.एस.पाटील,रजिस्ट्रार डॉ.व्ही.एन.शिंदे, प्रा.डॉ. एम.व्ही. गुळवणी उपस्थित होते.
डीकेटीई संस्थेच्या वतीने दरवर्षी अंबर हे नियतकालिक प्रसिध्द करण्यात येते यामध्ये विद्यार्थ्यांच्या दर्जेदार साहित्याबरोबरच माहितीपूर्ण लेखांचा तसेच रंगचित्रे, चित्ररेखाटन, छायाचित्रे यांचाही यामध्ये समावेश असतो. यापूर्वी विद्यापीठ स्तरावर अंबर या नियतकालिकेस अनेक पारितोषीके मिळाली आहेत आणि ही उज्वल परंपरा यावर्षीही कायम राहिली आहे. अंबर नियतकालिकेस संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव, डॉ. सपना आवाडे व संस्थेचे सर्व विश्वस्त यांचेसह संचालिका प्रा. डॉ. एल.एस.अडमुठे, डे. डायरेक्टर डॉ यु.जे.पाटील, सोशल डीन प्रा. एस.जी. कानिटकर यांचे मार्गदर्शन लाभले.

फोटो-शिवाजी विद्यापीठमध्ये डीकेटीईच्या अंबर या नियतकालिकेस प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.डी.टी. शिर्के व इतर मान्यवर.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800