“समाजाच्या जडण – घडणीत समाजशास्त्र महत्वाचे”
इचलकरंजी:
डीकेएएससी कॉलेजमध्ये समाजशास्त्र विभागाच्या वतीने समाजशास्त्र महत्व या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. व्याख्याना मध्ये बोलताना प्रमुख व्याख्याते प्रा. एम. एम. कांबळे म्हणाले विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबाशी संपर्क वाढवला पाहिजे. अलीकडे जीवनामध्ये विद्यार्थ्यांचा कुटुंब आणि समाजाचा वैचारिक संपर्क कमी झाल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. सामाजिक प्रश्नांची उकल आणि समाजमन घडवायचे झाल्यास जनसंपर्क वाढवणे महत्वाचे आहे. तसेच अध्यक्षीय मनोगतामध्ये बोलताना प्राचार्य एस. एम. मणेर म्हणाले समाजामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये नव्याने समस्या निर्माण होत आहेत. यासाठी विद्यार्थ्यांनी समाजाचे महत्त्व समजून घेऊन वाचन संस्कृती वाढवली पाहिजे. कार्यक्रमाचे स्वागत-प्रास्ताविक समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डी आर. नागर्थवार यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. रूपाली सांभारे यांनी केले तर आभार डॉ. सुशील कोरटे यांनी मानले यावेळी प्राध्यापक, प्राध्यापिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800