डी. के. ए. एस .सी कॉलेजच्या हिंदी विभागाची ग्रंथालय भेट व शैक्षणिक सहल संपन्न.
इचलकरंजी :
येथील दत्ताजीराव कदम आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेजच्या हिंदी विभागाच्या वतीने रविवार दिनांक २९ डिसेंबर २०२४ रोजी साताऱ्याच्या महादेवी वर्मा हिंदी ग्रंथालयास भेट देण्यात आली. यावेळी ग्रंथालयाचे संस्थापक श्री. तानाजी सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथालयाचा संपूर्ण इतिहास समजावून सांगत हिंदी भाषेच्या व ग्रंथालयाच्या भविष्यकालीन योजना विषयीची अत्यंत सखोल माहिती विद्यार्थ्यांना करून दिली. ते म्हणाले, “महादेवी वर्मा ग्रंथालय हे पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव हिंदी ग्रंथालय असून हिंदी भाषेच्या प्रसार आणि प्रचारांमध्ये ते अत्यंत सेवाभावी वृत्तीने कार्य करीत आहे.”
“अहिंदी भाषाभाषी प्रदेशांमध्ये अशा प्रकारचे समृद्ध हिंदी ग्रंथालय असणे ही खरोखरच अत्यंत अभिमानाची व आनंदाची गोष्ट आहे.” असे प्रतिपादन हिंदी विभाग प्रमुख प्राध्यापिका डॉ. अंजली उबाळे यांनी आपल्या प्रास्ताविक पर मनोगतातून व्यक केले. सहकार्यवाहक नारायण शिंदे व ग्रंथालयातील सर्व सदस्यांचे या ग्रंथ भेटी करिता मोलाचे सहकार्य लाभले. आभार प्राध्यापिका सफिया मुल्ला यांनी मानले.
महाबळेश्वर, पाचगणी, वाई, मेनवली व क्षेत्र माहुली या प्रेक्षणीय स्थळांना देखील विद्यार्थ्यांनी भेट दिली. या शैक्षणिक सहली मागील उद्देश विद्यार्थ्यांना हिंदी भाषा, साहित्य व संस्कृती विषयीची ओळख करून देणे हा होता. कॉलेजचे प्राचार्य डॉ.एस. एम. मनेर यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळेच ही शैक्षणिक सहल यशस्वीपणे पार पडली . प्राध्यापिका किशोरी टोणपे व प्राध्यापिका अपर्णा कांबळे यांनी सहलीचे सुयोग्य नियोजन करून विद्यार्थ्यांना सुखद अनुभव करून दिला.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800