चिमुकलीवर झालेल्या अत्याचारा विरोधात गोसावी समाज आक्रमक ,मोर्चाद्वारे प्रांताना निवेदन.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

चिमुकलीवर झालेल्या अत्याचारा विरोधात गोसावी समाज आक्रमक ,मोर्चाद्वारे प्रांताना निवेदन.

इचलकरंजी

राजगुरुनगर पुणे येथे घडलेल्या चिमुरड्यांच्या अत्याचार व हत्याकांडातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी.याकरिता इचलकरंजी शहर व परिसर गोसावी विकास मंचच्या वतीने प्रांतकार्यालयावर मोर्चा काढून प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांना निवेदन देण्यात आले. आक्रमक समाजबांधवांनी संशयित आरोपी अजय दास विरोधात जोरदार घोषणाबाजी करूत निदर्शने करण्यात आली.मोर्चात इचलकरंजी शहर व परिसरातील गोसावी समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातात फलक घेत महात्मा गांधी चौकातून मोर्चास सुरवात करण्यात आली. मोर्चा प्रांतकार्यालयावर आल्यावर घोषणाबाजी करत प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांना निवेदन देण्यात आले. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली.वेटर काम करणाऱ्या अजय दास नावाच्या परप्रांतीय कामगाराने शेजारी मजुरी करणाऱ्या ९ वर्षीय चिमुकल्या मुलींवर अत्याचार केले.तिची व तिच्या बहिणीची अमानुषपणे हत्या करण्यात आली.हे कृत्य समाजाला काळिमा फसणारे आहे. अशा गुन्हेगारास कठोर कारवाई होण्यासाठी विशेष सरकारी वकिलाची नेमणूक करण्यात यावी. तसेच फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्यास फाशीची शिक्षा देण्यात यावी.पिडित कुटुंबास मुख्यमंत्री सहायता निधी मधून आर्थिक मदत करावी.असे निवेदनात नमूद करण्यात आले. मोर्चात वसंत माळी,रवी गोंदकर,रामा जाधव,विशाल माळी,आकाश चव्हाण,संजय जाधव,सावकार जाधव यांच्यासह गोसावी बांधव मोठ्या संख्येने सहभागी होते. मोर्चास आ.राहुल आवाडे,मलकारी लवटे,विठ्ठल चोपडे यांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शवला.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More