निस्वार्थ भावनेने कार्यरत इनामची अन्नदान श्रेष्ठदान चळवळ व्यापक व्हावी-अति.आयुक्त सुषमा शिंदे.इनामच्या आवाहनास उस्फुर्त प्रतिसाद.३१ डिसेंबरचा खर्च टाळत सोशल मिडियाद्वारे केलेल्या आवाहनास शहरवासियांची सव्वा लाखाची मदत.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

निस्वार्थ भावनेने कार्यरत इनामची अन्नदान श्रेष्ठदान चळवळ व्यापक व्हावी-अति.आयुक्त सुषमा शिंदे.इनामच्या आवाहनास उस्फुर्त प्रतिसाद.३१ डिसेंबरचा खर्च टाळत सोशल मिडियाद्वारे केलेल्या आवाहनास शहरवासियांची सव्वा लाखाची मदत.

व्हिडीओ

https://youtu.be/_Cd6CLoBNvQ?si=ajdjlD8NtKxDB3Ef

इचलकरंजी
     निस्वार्थ भावनेने नियोजनबद्ध रितीने कार्यरत इनामची “अन्नदान श्रेष्ठदान” चळवळ व्यापक करण्याचे आवाहन अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांनी “अन्नदान श्रेष्ठदान” निधी सुपूर्द कार्यक्रमात केले.शुभम डायनिंग येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून मनोगत व्यक्त करताना त्यांनी नियोजनबद्ध उपक्रमाचे कौतुक केले.
इचलकरंजी शहरात वेगवेगळ्या समस्या जरूर आहेत त्यावर काम करताना शहरातील सामान्य नागरिकांसाठी खोलवर विचार करत अन्नदानाचा नियोजनबद्ध उपक्रमही इनाम राबवते हे उल्लेखनीय असल्याचे त्यांनी मनोगतात सांगितले.
प्रारंभी अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांचे स्वागत सौ.वैभवी निगुडगेकर यांनी केले.प्रास्ताविकात  अभिजित पटवा यांनी उपक्रमाची सुरवात व गेल्या साडेतीन वर्षाच्या वाटचालीचा आढावा घेतला.यावेळी इनाम सदस्य शितल मगदूम यांनी स्वतःच्या मुलीच्या लग्नात आहेराएवजी “अन्नदान श्रेष्ठदान” योजनेस मदत करण्याच्या केलेल्या आवाहनाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी आहेराची रक्कम असलेली अन्नदान श्रेष्ठदान मदतपेटी संयोजकांकडे सुपूर्द करण्यात आली.
इचलकरंजी शहरातील गरजू निराधार नागरिकांसाठी इचलकरंजी नागरिक मंच,बिजनेस पॉईंट ग्रुप व जेंटलमन ग्रुप मार्फत रोज दोनवेळचे डबे पोहोच करण्याचा उपक्रम १ मे २०२१ पासून अविरतपणे सुरू आहे.सदर उपक्रमाद्वारे ज्या नागरिकांना मिळालेले जेवणही जाऊन घेता येत नाही त्यांच्यासाठी घरपोहोच जेवण पोहोच करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
इचलकरंजी नागरिक मंच ही नागरिकांच्या हितासाठी लढणारी संघटना म्हणून इचलकरंजी शहरात परिचित आहे.इचलकरंजी शहरातील जागरूक नागरिक, घरगुती व्यावसायिक व व्यापारी यांच्यासाठी संस्थेचे वेगवेगळे ग्रुप व्हाट्सएपवर असून त्यामध्ये नागरिकांना व्यावसायिक देवाणघेवाण व माहिती आवश्यक वस्तू,संपर्क क्रमांक याबाबत तातडीने माहिती मिळते.३१ डिसेंबरच्या नियोजनातील काही रक्कम “अन्नदान श्रेष्ठदान” उपक्रमास देण्याचे आवाहन सदर संघटनेच्या तिन्ही व्हाट्सएप ग्रुपवर केले होते.सदर आवाहनास इनाम सदस्यांनी,व्यवसायिकांनी,विविध व्यापारी असोसिएशनच्या सभासदांनी जोरदार प्रतिसाद देत शंभर रुपयांपासून ते दहा हजार रुपयांची  मदत जमा केली.अवघ्या ५ दिवसात कोणत्याही प्रत्यक्ष भेट अथवा संपर्काशिवाय एकत्रित झालेला सव्वा लाख रुपयांचा निधी आज झालेल्या कार्यक्रमात “अन्नदान श्रेष्ठदान” योजनेत सुपूर्द करण्यात आला.गोळा झालेल्या रक्कमेतून शुभम डायनिंग व  डाके किराणा या प्रकल्पात सेवा देणाऱ्या आस्थापणाची बिले देण्यात आली.
डाके किराणा यांचे दहा हजाराचे बिल त्यांनी तसेच अन्नदान योजनेस सुपूर्द करत एक नविन आदर्श घालून दिला.
.इनामच्या सर्व व्हाटसप ग्रुपवर कार्यरत असणाऱ्या सर्वसामान्य नोकरदारापासून ते डॉक्टर, वकील,पत्रकार,व्यापारी,उद्योजक,इंजिनियर,किरकोळ विक्रेते सर्व क्षेत्रातील नागरिकांचा समावेश आहे.प्रत्येकाला छोट्या मोठ्या स्वरूपात मदत करायची इच्छा असते यासाठी इचलकरंजी नागरिक मंचच्या अन्नदान श्रेष्ठदान उपक्रमाच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध झाल्याने सदस्यांनी भरभरून मदत केल्याने इचलकरंजी नागरिक मंचच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले आहेत.
यावेळी दीपक निगुडगेकर,हर्षल बोरा यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास उदयसिंह निंबाळकर,सुहास पाटील,बाळु भंडारी,दयानंद लिपारे,अमित पटवा,अमोल ढवळे,लक्ष्मीकांत खंडेलवाल,हरीश देवाडिगा,रुपाली माळी,कल्पना माळी,राम आडकी,अमोल मोरे ,अमितकुमार बियाणी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.आभार संजय डाके यांनी मानले.
“अन्नदान श्रेष्ठदान” ५० ठिकाणी मदत संकलन पेटी वितरित करणार..
अन्नदान श्रेष्ठदान हा अविरत चालणारा उपक्रम असल्याने यासाठी उपस्थित हितचिंतकानी मदत पेटी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी लावण्यात यावी अशी मागणी केल्याने संयोजकांनी इचलकरंजी शहरातील नागरिकांना इच्छेनुसार मदत करणे शक्य व्हावे यासाठी ५० ठिकाणी मदत संकलन पेटी वितरित करण्याचे जाहीर केले
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More