रुग्णास रेफर केल्यामुळे आ.राहुल आवाडे आक्रमक,आयजीएम प्रशासनाचा समाचार.
व्हिडीओ
https://youtube.com/shorts/yhkT60PONko?si=QP8g95xj4KwG0QC_
इचलकरंजी –
हाताला फ्रॅक्चर झालेल्या चिमुरडीवर उपचार करण्याऐवजी तिला अन्यत्र जाण्यासाठी रेफर करण्यात आल्याच्या प्रकारावरुन आमदार राहुल आवाडे यांनी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील संबंधित वैद्यकिय अधिकार्यास धारेवर धरत कानउघडणी केली. सर्वसामान्यांचा आधारवड असलेल्या या रुग्णालयात असे प्रकार घडता कामा नयेत असे सांगत वैद्यकिय परवाना रद्द करण्याचा इशारा आमदार आवाडे यांनी दिला.
रुकडी (ता. हातकणंगले) येथील एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी पडल्याने तिच्या हाताला फ्रॅक्चर झाले. तिला तातडीने तिच्या आईने उपचारासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात आणले. त्याठिकाणी प्राथमिक उपचार करुन ड्युटीवर असलेल्या वैद्यकिय अधिकार्याने आवश्यक उपचार न करता त्या मुलीला खासगी रुग्णालयाची चिठ्ठी देत त्याठिकाणी उपचारासाठी जाण्यास पाठवले. त्याठिकाणी जावून माहिती घेतली असता उपचारासाठी 10 हजार रुपये खर्च येईल अस सांगण्यात आले. घरची परिस्थिती हलाखीनी असल्याने मुलीच्या आईने थेट आमदार राहुल आवाडे यांची भेट घेत त्यांना घडल्या प्रकाराची माहिती देत मदतीची विनंती केली.
आमदार आवाडे यांनी तातडीने संबंधित प्रकरणाची माहिती घेत थेट रुग्णालय गाठले. संबंधित वैद्यकिय अधिकार्यास बोलावून घेत विचारणा करत चांगीलच कानउघडणी केली. हे रुग्णालय सर्वसामान्यांसाठी असून याठिकाणी येणार्या रुग्णांवर आवश्यक ते उपचार होणे गरजेचे असताना त्यांना बाहेर का पाठविले जात असे असा सवाल करत हे रुग्णालय खासगी रुग्णालयांची दुकानदारी चालवण्यासाठी नाही, असे ठणकावले. या प्रकरणाची गांभिर्याने दखल घेत आमदार आवाडे यांनी संबंधित वैद्यकिय अधिकार्याचा परवाना रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांना पत्र देणार असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी संजय केंगार, कपिल शेटके, सुखदेव माळकरी, रमेश पाटील आणि मिटू सुरवसे आदी उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800