आ.रा.पाटील कन्या महाविद्यालयाच्या ४ विद्यार्थीनी गुणवत्ता यादीत.
येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयाच्या चार विद्यार्थिनींचे शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता यादीमध्ये निवड झालेली आहे.
यामध्ये कु.सानिका भोरे(मराठी विभाग), कु.मुस्कान मिराखान (राज्यशास्त्र विभाग),कु.सुप्रिया सवाईराम (हिंदी विभाग) कु. सुषमा गुरव (हिंदी विभाग) या विद्यार्थिनींनी शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवले आहे.
शैक्षणिक वर्ष 2023-2024 मध्ये या विद्यार्थिनींनी मराठी,हिंदी आणि राज्यशास्त्र या विषयातून संपूर्ण शिवाजी विद्यापीठांमध्ये गुणवत्ता यादीत आपले स्थान निश्चित केले आहे.
कन्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी दरवर्षीच शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता यादीमध्ये घवघवीत यश संपादन करत असतात.
कठोर परिश्रम,मार्गदर्शन आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी विद्यापीठ गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवले आहे.
याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाबासाहेब दुधाळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या विद्यार्थिनींना त्यांच्या भावी वाटचालीसाठी प्राचार्यांनी शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी प्रा.सुधाकर इंडी, डॉ.विठ्ठल नाईक, डॉ.मनोज जाधव, प्रा. वर्षा पोतदार,प्रा.डॉ.प्रतिभा पैलवान प्रा.संदीप पाटील उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800