विषबाधेतील रुग्णासाठी इचलकरंजीकरांचे दातृत्व,आधार ब्लड बँक,रोटरी क्लब ऑफ एक्झिक्युटिव्ह, जयहिंद युथ फौंडेशन,गॅलक्सी फौंडेशनची ४० हजाराचे मेडिकल साहित्य प्रदान.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

विषबाधेतील रुग्णासाठी इचलकरंजीकरांचे दातृत्व,आधार ब्लड बँक,रोटरी क्लब ऑफ एक्झिक्युटिव्ह, जयहिंद युथ फौंडेशन,गॅलक्सी फौंडेशनची ४० हजाराचे मेडिकल साहित्य प्रदान.

 

इचलकरंजी
काल शिवणकवडी येथील यात्रेत ८०० जणांना विषबाधा झाली होती. त्यामुळे इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात  रुग्णांची संख्या अचानकपणे वाढली.आरोग्य यंत्रणेवर पडलेल्या ताणाणे औषधे व सलाईन याचा तुटवडा भासण्याची शक्यता जाणवल्याने आधार ब्लड बँक, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी एक्झिक्युटिव्ह, जयहिंद युथ फाउंडेशन आणि गॅलेक्सी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज रुग्णालयात मध्ये १५०० सलाईन बॉटल्स,१०० आय.व्ही. सेट,४० सलाईन स्टँड असे ४० हजाराचे मेडिकल साहित्य तातडीने प्रदान केले.याप्रसंगी आधार ब्लड बँकेचे रो.सतीश मेटे,रो.प्रकाश मोरबाळे,रो.सुनील मांगलेकर यांनी प्रशासनाशी सकाळपासून संपर्क करून माहिती घेत घेतलेल्या पुढाकारामुळे तातडीने सलाईंन पोहोच झाल्या व वेळेत औषधोपचार करता आले.रो.अशोक गजबी यांनी तातडीने सलाईन्स उपलब्ध करून दिले,रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी एक्झक्युटिव्ह चे राजेश कडोलकर, गिरीश कुलकर्णी, संजय मेटे,श्रीहरी कामत,गणेश निकम,विवेक हसबे, सुनील, मंगलेकर,अशोक गजबी,आधार ब्लड बँकेचे अध्यक्ष सतीश मेटे, संजय टकले, डॉ.महादेव माने, डॉ, मधुकर जाधव, डॉ.अजिंक्य घट्टे, ग्यालेसी फौंडेशन चे चंद्रकांत कोरे, श्रुती मेटे, जयहिंद युथ फौंडशनचे सुहास गोरे, अमोल मेटे, गजानन चोथे, प्रकाश मेटे, शेखर नाईक, बाळू दुरुगडे, आदी उपस्थित होते
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More