ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी महानगरपालिकेची घरफाळा व पाणीपट्टी थकबाकीदारांवर कारवाई

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी महानगरपालिकेची घरफाळा व पाणीपट्टी थकबाकीदारांवर कारवाई.

इचलकरंजी :

इचलकरंजी महानगरपालिकेच्या कर विभागातर्फे थकबाकीदारांवर विशेष वसुली मोहीम राबवण्यात येत आहे. आजच्या मोहिमेत अनेक मिळकतधारकांवर कारवाई करत त्यांची मिळकत सील करण्यात आली आहे.महानगरपालिकेच्या विशेष वसुली पथकांनी प्रकाश नेमाण्णा चौगुले (वार्ड क्र. ३, घर क्र. ८२७/१) – थकबाकी रु. ८७,०८७,चांदसाहेब घुडुलाल दफेदार (वार्ड क्र. २५, घर क्र. २५/६८२/२) – थकबाकी रु. १,९७,०००,लहू केशव पोईपकर (वार्ड क्र. १३, घर क्र. ६०१) – थकबाकी रु. १,३८,३८०,रत्नाबाई श्रीपती पाटील (वार्ड क्र. १४, घर क्र. ६२) – थकबाकी रु. ४८,३८३,मौला महंमद नदाफ (वार्ड क्र. १४, घर क्र. ६२०) – थकबाकी रु. ५७,७९१रामा म्हादू चांभार (वार्ड क्र. १, घर क्र. ७१९) – थकबाकी रु. २९,३३७ यांचे सीलिंगसह पाणी कनेक्शन कट करण्यात आले. विशेष वसुली पथकाने चांदसाहेब घुडुलाल दफेदार (वार्ड क्र. २५, घर क्र. २५/६८२/२) यांचे पाणी कनेक्शन थकबाकीमुळे कट केले आहे.

महानगरपालिकेने थकबाकीदारांनी त्वरित कर भरणा करावा, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा