जर्मन टोळीतील दोघांसह दरोड्याच्या तयारीत असलेले पाचजण साताऱ्यात अटक

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

जर्मन टोळीतील दोघांसह दरोड्याच्या तयारीत असलेले पाचजण साताऱ्यात अटक

सातारा :
इचलकरंजी येथील जर्मन टोळीतील दोघांसह सशस्त्र दरोडयाच्या तयारीत असणाऱ्या ५ आरोपीना सातारा पोलिसांनी अटक करुन त्यांचे ताब्यातून २ बंदुकीसह २ पिस्टल, ५ जिवंत काडतुसे, ४ रिकाम्या पंगळ्या व धारधार हत्यारे अशी ४,४१, २००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी सातारा जिल्हयामध्ये घडणाऱ्या गंभीर गुन्हयांवर नियंत्रण ठेवण्याच्या सुचनेनुसार २० फेब्रुवारी रोजी सातारा शहर पोलीस ठाणेकडील शाहूनगर परिसरामध्ये ११२ वरून मिळालेल्या माहितीनुसार अजिंक्यतारा किल्ल्याचे पायथ्याला असणारे मंगळाई मंदिराकडे जाणारे रोडचे समोर असलेल्या मैदानामध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत काही जण असल्याची माहिती मिळाली यानुसार  बीट मार्शल २ वर कार्यरत असणारे पोलीस अंमलदार तात्काळ तेथे गेल्यानंतर त्यांना काही इसम हातात लोखंडी सुऱ्या सारखी हत्यारे दिसल्याने जादा कुमक मागवून १) अनुज चिंतामणी पाटील वय २१ वर्षे, रा.२६७ गुरुवारपेठ सातारा, २) दिप भास्कर मालुसरे वय १९ वर्षे रा.१६४ गुरुवारपेठ शिर्के शाळेजवळ सातारा, ३) आनंद शेखर जाधव उर्फ जर्मनी वय २५ वर्षे रा. हनुमाननगर इचलकरंजी कोल्हापूर, ४) अक्षय अशोक कुंडूगळे वय २५ वर्षे रा.जवाहरनगर इचलकरंजी कोल्हापूर, ५) क्षितीज विजय खंडाईत रा. गुरुवारपेठ सातारा या इसमांना ताब्यात घेवून त्यांची अंगड़ाडती घेतली असता त्यांचे कब्जात २ देशी बनावटीची पिस्टल, ५ जिवंत काडतुसे, ४ रिकाम्या पुंगळ्या, २ मोटार सायकल, २ लोखंडी सुरे, मोबाईल हॅन्डसेट असा एकूण ४,४१,२००/- रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला असून त्याबाबत नमुद इसमांचेकडे विचारपूस करता, ते सातारा शहरातील सोन्याचे दुकान फोडून सोने चोरी करणार होते अशी कबुली दिल्याने सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
वरील कारवाई श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के सातारा शहर पोलीस ठाणे, सहायक पोलीस निरीक्षक शाम काळे, शिवाजी भोसले, दत्तात्रय दराडे, रोहित फाणें, पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, विश्वास शिंगाडे, परितोष दातीर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार विजय कांबळे, संजय शिर्के, शरद बेबले, लैलेश फडतरे, अजय जाधव, प्रविण फडतरे, अविनाश चव्हाण, स्वप्नील कुंभार, अरुण पाटील, गणेश कापरे, ओंकार यादव, सचिन ससाणे, विशाल पवार, रोहित निकम, रविराज वर्णेकर, मोनाली निकम, अनुराधा सणस, सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार श्रीनिवास देशमुख, राहुल घाडगे, सुजित भोसले, पंकज मोहिते, इरफान मुलाणी, विनायक मानवी, तुषार भोसले, सागर गायकवाड, होमगार्ड इंगळे यांनी केली आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More