छत्रपती संभाजी महाराज नगर मध्ये औरंगजेबाची कबर हटविण्याची विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाची मागणी.
इचलकरंजी:
छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये स्थित परकीय आक्रमक औरंगजेबाची कबर हटविण्याची मागणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलामार्फत मुख्यमंत्र्यांना प्रांताधिकारी यांच्या मार्फत निवेदनाद्वारे केली जात आहे.या कबरवरून स्थानिक हिंदू संघटनांनी आपली नाराजी व्यक्त केली असून, त्यासाठी एक निवेदन राज्य सरकारकडे देण्यात आले आहे.
निवेदनामध्ये औरंगजेबाच्या क्रूर कृत्यांचा उल्लेख करत, त्याचे स्मारक(कबर) हटविण्याची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये शिख गुरु तेगबहादूर यांच्या हत्या, छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्या, आणि भारतातील अनेक हिंदू मंदिरे तोडण्याची त्याची भूमिका सांगितली गेली आहे.
निवेदन देणाऱ्या कार्यकर्त्यांनी आणि संघटनांनी सरकारकडून औरंगजेबाची कबर पूर्णपणे हटविण्याची विनंती केली आहे. यावेळी अमित कुंभार,युवराज सावंत,विनायक पोवार,रविकिरण हुक्केरीकर,सुजित कांबळे, शिवप्रसाद व्यास,प्रविण सामंत, गणेश कांदेकर,सर्जेराव कुंभार, आणि मुकुंदराज ऊरुणकर यांचा समावेश आहे.
कार्यकर्त्यांनी निवेदनात सरकारला दिलेल्या इशाऱ्यात कबर हटविण्याचा निर्णय न घेतल्यास,ते स्वतः कबर उध्वस्त करतील असेही म्हंटले आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800