खुला गट राज्य अजिंक्यपद कबड्डी :दादा पुजारी,अमृता जाधव कोल्हापूर जिल्ह्याचे कर्णधार
कोल्हापूर:
ठाणे येथे बुधवारपासून खेळल्या जाणाऱ्या खुल्या गटाच्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारे संघ जाहीर करण्यात आले असून शिवराय शिरोलीचा दादासो पूजारी पुरुष संघाचे तर हिरण्यकेशी आजरा संघाची अम्रुता जाधव महिला संघाचे नेतृत्व करणार आहे.
कोल्हापूर जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा इचलकरंजीतील जयहिंद मंडळाच्या क्रिडांगणावर माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू व संघटक स्व.मल्हारपंत बावचकर यांच्या जन्मशताब्दी औचित्यातून घेण्यात आल्या.या स्पर्धेतून निवडण्यात आलेल्या प्राथमिक खेळाडूंचे सराव शिबिर येथील साधना मंडळाच्या क्रिडांगणावर होऊन कोल्हापूर जिल्ह्याचे संघ जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष प्रा.संभाजी पाटील यांनी जाहीर केले.
डॉ.रमेश भेंडिगिरी,प्रा.शिवाजी चोरगे, विलास खानविलकर व अजित पाटील यांच्या समितीने पुरुष तर प्रा.चंद्रशेखर शहा,उमा भेंडिगिरी व के.एस.माने यांनी महिला संघाची निवड केली.
कोल्हापूर जिल्ह्याचे कबड्डी संघ -पुरुष… दादासो पूजारी(शिवराय शिरोली-कर्णधार),साहिल पाटील व अविनाश चरापले (शिवमुद्रा कौलव),सौरभ इंगळे व अवधूत पाटोळे(बालशिवाजी शिरोळ), आदित्य पोवार व सौरभ फगरे (जयहिंद इचलकरंजी), तुषार पाटील (शाहू सडोली), साईप्रसाद पाटील (मावळा सडोली), ओंकार पाटील (सह्याद्री कोल्हापूर), धनाजी भोसले (नवभारत शिरोली),सर्वेश करवते (उदय छावा,रेंदाळ)
प्रशिक्षक -शहाजहान शेख,व्यवस्थापक-प्रा.संदिप लवटे
महिला — अमृता रविंद्र जाधव (हिरण्यकेशी,आजरा-कर्णधार),आरती कृष्णात पाटील व मृणाली विलास टोणपे(जय हनुमान ,बाचणी),प्राची दिलीप डांगे व समिक्षा पांडुरंग डोंगळे (हिंदवी,कौलव), साक्षी शिवाजी निकम (म्हालसवडे),ऋतुजा संजय अवघडी (कोरोची),अनिषा राजू निकम (जांभळी), दिपा जिनपाल पूजारी (डायनॅमिक इचलकरंजी),मधुरा प्रकाश दळवी (हिरण्यकेशी,आजरा), वैष्णवी गजेंद्र पाटील (महालक्ष्मी, कोल्हापूर), श्रद्धा विनोद पाटील (जयकिसान, वडणगे)
प्रशिक्षक-के.एस.माने, व्यवस्थापक-सुरज पाटील

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800