कर्तृत्व संपन्न स्त्री ही कुटुंब आणि समाजाला घडविते : मधुरीमाराजे छत्रपती.महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळातर्फे महिला व समाज मेळावा आणि पुरस्कार वितरण
इचलकरंजी:
कर्तृत्व संपन्न स्त्री ही आपल्या कुटुंबाला आणि समाजाला घडवत असते, असे गौरवोद्गगार सौ. मधुरीमाराजे छत्रपती यांनी काढले. महाराष्ट्र कोष्टी समाजसेवा मंडळ मुंबई आयोजित आणि श्री देवांग समाज चौंडेश्वरी मंदिर कोल्हापूर व श्री देवांग समाज इचलकरंजी यांच्या सहकार्याने आयोजित राज्यस्तरीय महिला व समाज बांधवांच्या मेळाव्यात कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या या नात्याने त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जीएसटी पुणे उपायुक्त श्रीमती मनीषा तारळेकर होत्या.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाल्यानंतर स्वागत राजेंद्र ढवळे यांनी केले. प्रास्ताविकात महाराष्ट्र कोष्टी समाजसेवा मंडळ महिला अध्यक्षा सौ. सुषमा दौंडे यांनी मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला. महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रकाशराव सातपुते यांनी मंडळाच्या आजवरच्या कार्याचा आणि भविष्यातील उपक्रमांचा आढावा सादर केला.
श्रीमती मनिषा तारळेकर यांनी, स्त्रियांनी खूप शिकावे. विशेषतः स्पर्धा परीक्षा द्याव्यात म्हणजे स्वावलंबी होता येईल, असे आवाहन केले. प्रमुख पाहुण्यांचे हस्ते सौ. सुवर्णा राजेंद्र गुंडगे यांना ‘आदर्श माता’ पुरस्काराने तसेच कोल्हापूर कोष्टी समाज महिला मंडळ यांना ‘आदर्श संस्था’ म्हणून गौरविण्यात आला. तर अंकुशराव उकार्डे, दत्तोपंत चौथे, महादेवराव इदाते, स्व. भास्करराव रोकडे (मरणोत्तर) यांना ‘समाज शिरोमणी’ पुरस्कार तसेच सौ. विजयमाला वाघ, सौ. मेघमाला पांडकर, सौ. सारिका दिवटे, सौ. आरती वागावकर, सौ. निता कोष्टी, सौ. राजश्री धुमाळे, सौ. शर्वरी बोत्रे, यांना ‘समाजभूषण आदर्श महिला’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले अमोल कुमठेकर, बाळासाहेब फलके, शंकर वैद्य, सतीश इदाते, डॉ. अनिल कांबळे, प्रफुल्ल लाटणे, दिलीप भंडारे यांना ‘समाजभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले. समाजातील युवकांच्या विकासासाठी योगदान दिल्याबद्दल दत्तात्रय ढगे, मनोहर बुचडे, मकरंद चिनके, हेमंत बोत्रे, राजेश सपाटे, प्रशांत कबाडे, विजय मुसळे, जयेश बुगड यांना ‘युवा नेतृत्व’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार वितरण सोहळा मंडळाचे अध्यक्ष प्रकाशराव सातपुते, अरविंद तापोळे, विश्वनाथ मुसळे, संजय कांबळे, भास्कर गुंडगे, उदयराव बुगड, इत्यादी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. स्वागत महासचिव रामचंद्र निमणकर यांनी केले. प्रस्ताविक राज्याच्या अध्यक्षा सौ. सुषमा दौंडे यांनी केले. सूत्रसंचालन सौ. राजश्री ढवळे, सौ. वनिता ढवळे, सौ. पूजा दवंडे यांनी केले. तत्पूर्वी सौ. गंधाली दिंडे यांनी शासकीय योजनांची माहिती दिली. परिचय सौ. विजयमाला वाघ, कु. शैला मोरे चौक, सौ. स्मिता बुगड, सौ. स्मिता सातपुते, श्रीमती हेमलता मुसळे, सौ. जयश्री रोकडे, भारती कांबळे आदींनी करून दिला. आभार योगीराज साखरे यांनी मानले. या कार्यक्रमाचे नियोजन व देखरेख श्री देवांग समाज चौंडेश्वरी मंदिर कोल्हापूरचे अध्यक्ष राजेंद्र ढवळे व त्यांच्या मंडळाने उत्तमरीत्या पार पडले.
कार्यक्रमास बळीराम कवडे, मल्हारराव ढोले, किरण तारळेकर, विठ्ठलराव डाके, वस्त्रोद्योग समिती सदस्य मनोजराव दिवटे, नारायण उंटवाले, सौ. मंदा म्हेत्रे, भास्करराव गुंडगे, सुरेश म्हेत्रे, राहुल सातपुते, गजानन होगाडे, अमोल सातपुते, कुमार कबाडे, सौ. ऐश्वर्या सातपुते, श्रीमती प्राजक्ता होगाडे, सौ. तेजस सातपुते, महेश सातपुते, हेमंत आमणे, शीतल सातपुते, सूर्यकांत लोले, हिमांशू मिरगे, तसेच कोष्टी समाजातील विविध संस्थांचे संचालक पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800