शहापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल.
इचलकरंजी
शहापूर येथील म्हाडा कॉलनीत १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचा छळ झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. याप्रकरणी शिक्षक विजय भागवत कुंडलकर (वय ३६) याच्याविरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१६ मार्च २०२५ रोजी सकाळी ९ ते १० दरम्यान, मुलगी घरी एकटी असताना आरोपीने घरात प्रवेश केला आणि तिच्याशी गैरवर्तन केले. तसेच घटनेची माहिती कोणाला सांगू नये,अशी धमकी दिली.पीडित मुलीच्या आईने तातडीने शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. यानुसार, आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांप्रमाणे तसेच पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून, पोलिसांनी आरोपीच्या अटकेसाठी शोधमोहीम सुरू केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी करीत आहेत.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800