
इचलकरंजी :
येथील विठ्ठल रामजी शिंदे प्रशालेच्या पटांगणावर सहकार महर्षि क‘ाप्पाण्णा आवाडे क‘ीडानगरीत सुरु असलेल्या कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेच्या दुसर्या दिवशी सकाळाच्या सत्रात पुरुष आणि किशोर गटात कोल्हापूर, महिला गटात धाराशिव तर किशोरी गटात सांगली जिल्हा संघाने चमकदार विजय प्राप्त आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. पुरुष विभागात पुण्याचा साहिल चिखले, कोल्हापूरचा सुशांत कलढोणे, मुंबईचा सम्यक जाधव, अहिल्यानगरच्या गौरव कुदळे व सारंग लबडे, मुंबईचा वेदांत देसाई तर महिला विभागात सांगलीची रिता मगदूम, सोलापूरची सादिया मु‘ा व स्नेहा लकमाने, अमरावतीची वैष्णवी ढोके, किशोरी विभागात पुण्याच्या आरती घट्टे, ठाण्याची प्रणिती जगदाळे, पुण्याची अपर्णा वर्धे यांनी चमकदार कामगिरीद्वारे उपस्थितांचे लक्ष वेधले.
पुरुष विभागात मुंबई उपनगर विरुद्ध अहिल्यानगर या सामन्यात मुंबई उपनगरने ४ गुणांनी विजय मिळविला. अहिल्यानगर संघातील सारंग लबडे याने १ मी. ४० से. व ३० से. संरक्षण करून ३ गडी टिपले तर गौरव कुदळे याने १ मी. ५० से. ४० से. संरक्षण करून २ गडी बाद केले. पुणे विरुद्ध ठाणे या सामन्यात पुणे संघाने १ गुणाने विजय प्राप्त केला. त्यात पुणे संघाच्या अथर्व दहने याने २ मि. व १ मि. १० से. संरक्षण करून २ गडी बाद केले तर साहिल चिखले याने ५० से. व १ मी. ४० से. संरक्षण करून तब्बल ७ गडी टिपले. ठाण्याच्या रुपेश कोंढाळकर याने १ मी. १० से. व ३० से. संरक्षण करीत २ गडी बाद केले तर राज संकपाळ याने १ मि. २० से. संरक्षण करून १ गडी टिपला. सांगली विरुद्ध अमरावती यातील सामन्यात सांगली संघाने १ गुण व ७ मी. ५० से. इतका वेळ राखून विजय प्राप्त केला. सांगलीच्या सौरभ घाडगे याने २ मी. १० से. संरक्षण करीत २ गडी बाद केले तर अभिषेक केरीपाळे याने १ मी. ३० से. संरक्षण करीत ४ गडी टिपले. अमरावतीच्या प्रतीक पाल याने १ मी. १० से. संरक्षण व २ विकेट घेण्याची कामगिरी केली तर चेतन उके याने १मी. संरक्षण करीत १ गडी टिपला. मुंबई विरुद्ध कोल्हापूर या सामन्यात कोल्हापूर संघाने ८ गुणांनी विजय प्राप्त केला. कोल्हापूरच्या रोहन कोरे याने २ मी. व २ मी. असे संरक्षण करीत २ गडी टिपले. श्रीराम कांबळे याने २ मी. व १ मी. २० से. असे संरक्षण केले तर सुशांत कलढोणे याने ४ गडी टिपण्यात यश मिळविले. कोल्हापूरच्याच राजवर्धन पाटील याने १ मी. व २ मी. संरक्षण करीत १ गडी बाद केला. तर मुंबईच्या श्रीकांत व‘ाकाठी १ मी. १० से. व २ मी. १० से. संरक्षण तर सम्यक जाधव याने ३ गडी टिपत चांगली लढत देण्याचा प्रयत्न केला. अहिल्यानगर विरुद्ध गडचिरोली या सामन्यात अहिल्यानगरने २ गुण व ८ मिनिटे २० सेकंद इतकी वेळ राखून विजय प्राप्त केला. अहिल्यानगरच्या गौरव कुदळे याने १ मिनिट ३० सेकंद व २ मिनिटे ३० सेकंद असे संरक्षण करीत ५ गडी बाद केले. सारंग लबडे याने १मिनिट ३० सेकंद संरक्षण करीत ५ गडी बाद केले.गडचिरोलीच्या समित सडमेत याने १ मिनिट व १मिनिट असे संरक्षण करीत २ गडी टिपले तर करण मडावी याने १ मिनिट ३० सेकंद संरक्षण करीत ३ गडी बाद केले. धाराशिव विरुद्ध मुंबई या सामन्यात मुंबई संघाने एक गुणाने विजय प्राप्त केला. मुंबई संघाच्या वेदांत देसाई याने १ मिनिट २० सेकंद व ३० सेकंद असे संरक्षण करीत ५ गडी बाद केले. जनार्दन सावंत याने १मिनिट व १ मिनिट २० सेकंद असे संरक्षण करीत तिसर्या डावात ४० सेकंद नाबाद संरक्षण केले. सनी तांबे याने १ मिनिट ५० सेकंद व १मिनिट असे संरक्षण करीत २ गडी बाद केले. सोलापूर विरुद्ध अमरावती या सामन्यात सोलापूर संघाने १ गुण व १ डाव राखून विजय प्राप्त केला. सोलापूर संघाच्या अजय कश्यप याने २ मिनिटे व २ मिनिटे असे संरक्षण करीत ४ गडी बाद केले. सौरभ चव्हाण याने २ मिनिटे व ४० सेकंद असे संरक्षण करीत २ गडी टिपले. अमरावतीच्या प्रतीक पाल याने १ मिनिट १० सेकंद संरक्षण करीत ३ गडी बाद केले तर अंकुश शिरसाट याने ३० सेकंद व १ मिनिट असे संरक्षण करीत २ गडी बाद केले.
महिला विभागात धाराशिव विरुद्ध मुंबई सामन्यात धाराशिव संघाने १ डाव व ५ गुणांनी विजय प्राप्त केला. धाराशिवच्या मैथिली पवार हिने ३ मिनिटे २० सेकंद संरक्षण केले. प्रणाली काळे हिने २ मिनिटे २० सेकंद संरक्षण करीत २ गडी बाद केले. मुंबईच्या संजना कुडव हिने २ मिनिट संरक्षण करीत १ गडी टिपला तर सेजल यादव हिने ३० सेकंद व २ मिनिटे ३० सेकंद असे संरक्षण केले. सांगली विरुद्ध अकोला या झालेल्या सामन्यात सांगली संघाने ५ गुणांनी विजय प्राप्त केला. सांगलीच्या सानिका चाफे हिने ५ मिनिटे ३० सेकंद असे संरक्षण करीत १ गडी टिपला. रिया चाफे हिने ३ मिनिटे २० सेकंद संरक्षण करीत ३ गडी बाद केले. रितिका मगदूम हिनेही ४ गडी बाद करण्यात यश मिळविले. अकोल्याच्या लक्ष्मी उंबरकर हिने १ मिनिट व ३० सेकंद असे संरक्षण करीत १ गडी बाद केला तर प‘वी परदे हिने १ मिनिट १० सेकंद व १मिनिट ४० सेकंद असे संरक्षण केले. सोलापूर विरुद्ध नागपूर सामन्यात सोलापूर संघाने १ डाव व ३ गुणांनी विजय मिळविला. सोलापूर संघाच्या सादिया मु‘ा हिने १मिनिट ५० सेकंद संरक्षण करीत ५ गडी बाद केले. स्नेहा लकमाने हिने ३ मिनिटे ५० सेकंद संरक्षण करीत ४ गडी टिपले. नागपूरच्या सारिका पोरेटी हिने २ मिनिटे व १मिनिट संरक्षण करीत ४ गडी बाद केले. तर मनस्वी नेहारे हिने १मिनिट १० सेकंद संरक्षण केले. नाशिक विरुद्ध कोल्हापूर यांच्या दरम्यान झालेल्या सामन्यात कोल्हापूर संघाने १ गुण व ५ मिनिटे ५० सेकंद वेळ राखीत विजय प्राप्त केला. कोल्हापूरच्या स्वाती पाटील हिने ३ मिनिटे १० सेकंद व २ मिनिटे असे संरक्षण केले. श्रेेया पाटील हिने १मिनिट २० सेकंद संरक्षण करीत ४ गडी बाद केले. सौंदर्य सुतार हिने १ मिनिट ३० सेकंद व १मिनिट ३० सेकंद असे संरक्षण करीत २ गडी बाद केले. नाशिकच्या ज्योती मेढे हिने १ मिनिट २० सेकंद व १मिनिट ४० सेकंद संरक्षण करीत १ गडी बाद केला. वृषाली भोये हिने ५ गडी टिपण्यात यश मिळविले. मुंबई विरुद्ध अमरावती सामन्यात मुंबई संघाने २ गुण व १ डाव राखून विजय प्राप्त केला. मुंबई संघाच्या संजना कुडव हिने २ मिनिटे ३० सेकंद व २ मिनिटे ४० सेकंद असे संरक्षण केले. खुशक सुतार हिने २ मिनिट संरक्षण करीत ४ गडी टिपले. अमरावतीच्या वैष्णवी ढोके हिने १मिनिट ३० सेकंद संरक्षण करीत ४ गडी टिपले तर रेश्मा गजभिये हिने १ मिनिट ३० सेकंद संरक्षण करीत १गडी बाद केला.
किशोर विभागात धाराशिव विरुद्ध सांगली सामन्यात सांगली संघाने ५ मिनिटे २० सेकंद इतकी वेळ राखीत ३ गुणांनी विजय प्राप्त केला. सांगलीच्या सार्थक हिरेकुर्ब याने ३ मिनिटे व २ मिनिटे २० सेकंद असे संरक्षण करीत २ गडी टिपले. आदर्श सरगर याने १ मिनिट ४० सेकंद व ५० सेकंद असे संरक्षण करीत एक गडी बाद केला. धाराशिवच्या सुरेश वसावे याने ४ गडी बाद केले तर भीमसिंग वसावे याने २ मिनिटे १० सेकंद संरक्षण करीत ३ गडी बाद केले.सातारा विरुद्ध कोल्हापूर या सामन्यात कोल्हापूर संघाने २ गुण व १ मिनिट राखून विजय प्राप्त केला. कोल्हापूरच्या गौरव माने याने १ मिनिट व १ मिनिट १० सेकंद संरक्षण करीत ६ गडी टिपले तर अथर्व यादव याने १मिनिट संरक्षण करीत ३ गडी बाद करण्यात यश मिळविले. सातार्याच्या प्रतीक खंडागळे याने १मिनिट व २ मिनिटे २० सेकंद संरक्षण करीत ४ गडी बाद केले तर वरद पोळ याने १ मिनिट व १ मिनिट असे संरक्षण करीत ४ गडी टिपले.पुणे विरुद्ध नागपूर या सामन्यात पुणे संघाने १ डाव ४ गुणांनी विजय प्राप्त केला. पुण्याच्या सुशांत कोळी याने ३ मिनिटे संरक्षण करीत ३ गडी बाद केले तर प्रणित सस्ते याने २ मिनिट व ३ मिनिटे २० सेकंद संरक्षण करीत १ गडी टिपला. नागपूरच्या भाविक बघेल याने १ मिनिट ४० सेकंद संरक्षण करीत २ गडी बाद केले तर सुशांत वाघाडे याने २ गडी टिपले.ठाणे विरुद्ध सातारा सामन्यात सातारा संघाने १ गुण व ३ मिनिटे राखीत विजय प्राप्त केला. सातार्याच्या प्रतीक खंडागळे याने १मिनिट २० सेकंद व १मिनिट ४० सेकंद संरक्षण करीत तब्बल ५ गडी टिपले. आयुष यादव याने १ मिनिट ५० सेकंद व २ मिनिटे असे संरक्षण केले. ठाण्याच्या विनायक भणगे याने १ मिनिट १० सेकंद व १ मिनिट २० सेकंद संरक्षण करीत ६ गडी बाद केले तर अरुण गरेल याने १ मिनिट २० सेकंद वन१ मिनिट संरक्षण करीत १ गडी बाद केला.सांगली विरुद्ध नागपूर या सामन्यात सांगली संघाने १ डाव ९ गुणांनी विजय प्राप्त केला.सांगलीच्या दक्ष जाधव याने २ मिनिटे ३० सेकंद व १ मिनिट ३० सेकंद संरक्षण करीत ३ गडी टिपले. आदर्श सरगर याने ४ गडी बाद केले. नागपूरच्या भाविक बघेल याने ४० सेकंद व १ मिनिट असे संरक्षण केले तर नैतिक शेंदरे याने २ गडी बाद केले.
किशोरी विभागात पुणे विरुद्ध ठाणे या संघादरम्यान झालेल्या सामन्यात पुणे संघाने १ गुणाने विजय प्राप्त केला. पुण्याच्या अपर्णा वर्धे हिने २ मिनिटे १० सेकंद व ४० सेकंद संरक्षण करीत १ गडी बाद केला तर आरती घट्टे हिने १ मिनिट ४० सेकंद संरक्षण करीत तब्बल ५ गडी बाद केले. ठाण्याच्या प्रणिती जगदाळे हिने २० सेकंद व २० सेकंद संरक्षण करीत ५ गडी बाद केले. तर निधी जाधव हिने २ मिनिट १० सेकंद व १ मिनिट १० सेकंद संरक्षण करीत एक गडी बाद केला.धाराशिव व सांगली या संघादरम्यान झालेल्या सामन्यात सांगली संघाने ७ गुणांनी विजय प्राप्त केला. सांगलीच्या श्रावणी तामखडे हिने २ मिनिटे २० सेकंद व २ मिनिटे ३० सेकंद असे संरक्षण करीत ३ गडी बाद केले तर रेश्मा मुजावर हिने १ मिनिट ३० सेकंद व २ मिनिटे १० सेकंद संरक्षण करीत १गडी बाद केला. धाराशिव जिल्ह्याच्या ईश्वरी सुतार हिने १ मिनिट २० सेकंद व १ मिनिट ३० सेकंद संरक्षण करीत २ गडी बाद केले तर श्रावणी गुंड हिने १ मिनिट २० सेकंद व १ मिनिट ३० सेकंद संरक्षण करीत १ गडी बाद केला. सोलापूर विरुद्ध ठाणे सामन्यात ठाणे संघाने ४ गुणांनी विजय प्राप्त केला. ठाण्याच्या प्रणिती जगदाळे हिने २ मिनिटे व २ मिनिटे असे संरक्षण करीत २ गडी बाद केले तर समृद्धी कदम हिने १ मिनिट ३० सेकंद व एक मिनिट ३० सेकंद असे संरक्षण केले. सोलापूरच्या श्रेया यलमार हिने नाबाद १ मिनिट १० सेकंद व १ मिनिट ३० सेकंद असे संरक्षण करीत २ गडी बाद केले तर भक्ती ज्योतीराम हिने १ मिनिट २० सेकंद व २ मिनिट १० सेकंद संरक्षण करीत १ गडी बाद केला. पुणे विरुद्ध नागपूर सामन्यात पुणे संघाने १ डाव ३ गुणांनी विजय प्राप्त केला. पुण्याच्या अपर्णा वर्धे हिने ३ मिनिट मिनिटे संरक्षण करीत ४ गडी बाद केले तर आरती घट्टे हिने १मिनिट संरक्षण करीत २ गडी बाद केले. नागपूरच्या इशा ठाकरे हिने १ मिनिट २० सेकंद संरक्षण करीत ३ गडी बाद केले तर खुशबू नेटारे हिने ३० सेकंद व ४० सेकंद संरक्षण करीत २ गडी बाद केले.
बुधवारी सकाळच्या सत्रात साखळी सामने होतील व संध्याकाळपासून उपांत्य फेरीच्या सामन्यांना सुरुवात होईल. गुरुवारी सकाळच्या सत्रात तृतीय क‘मांकाचे सामने तर संध्याकाळच्या सत्रात अंतिम फेरीचे सामने होतील.
फोटो- खो-खो स्पर्धेतील अविस्मरणीय क्षण

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800