आमदार राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान अंतर्गत इचलकरंजी महानगरपालिकेस १ कोटीचा निधी
इचलकरंजी –
इचलकरंजी महानगरपालिकेची अग्निशमन यंत्रणा अत्याधुनिक सुविधानी परिपूर्ण असावी यासाठी आमदार राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून 1 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
इचलकरंजी शहर हे वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र आहे. वस्त्र उद्योगाशी संबंधित अनेक उद्योगधंद्यामुळे शहराचे औद्योगीकरण वाढत चालले आहे. यामध्ये नानाविध कारणांनी दुर्घटना घडत असतात. त्यामानाने महापालिकेकडे अग्निशमन यंत्रणा तोकडी पडत आहे. ही गरज लक्षात घेऊन आमदार राहुल आवाडे यांनी शासन दरबारी पाठपुरावा सुरु ठेवला होता. त्याला यश मिळाले आहे. महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान अंतर्गत अग्निशामन सेवा आणि आणीबाणीच्या सेवांचे बळकटीकरण करणेसाठी अग्निशमन वाहन खरेदी व इतर पूरक अत्यावश्यक साहित्य खरेदीसाठी इचलकरंजी महानगरपालिकेस १ कोटी रुपयाचा निधी मंजुर झाला आहे. अनेक दिवस प्रलंबित असलेले काम शासन स्तरावर पाठपुरावा करुन मंजुर करुन आणल्याने महानगरपालिकेत आता अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित होणार आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800