कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बँकेचा २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये निव्वळ एनपीए ०% व रु. ५५ कोटीचा उच्चांकी नफा
इचलकरंजी :
नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये बँकेचे सभासद, ठेवीदार, कर्जदार व ग्राहक यांचे बहुमुल्य सहकार्य व विश्वास यामुळे आजच्या आर्थिक टंचाईच्या काळातही बँकेचा मार्च २०२५ अखेर एकूण व्यवसाय रु. ४७०८ कोटी इतका झाला. यामध्ये ठेवी रु. २८६२ कोटी व रु. १८४६ कोटींच्या कर्जाचा समावेश आहे. बँकेचे भागभांडवल रु. ७७ कोटी इतके झाले असून, आर्थिक तरतूदीपूर्वीचा नफा रु. ५५ कोटी इतका झाला. अतिशय आनंदाची बाब म्हणजे, बँकेने या वर्षी ०% निव्वळ एनपीएचे स्वप्न साकार करण्यामध्ये यश प्राप्त केलेले असल्याची माहिती बँकेचे चेअरमन श्री स्वप्निल आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
माजी खासदार व बँकेचे संस्थापक चेअरमन श्री कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा) व आमदार श्री प्रकाश आवाडे यांनी वेळोवेळी दिलेल्या अनमोल मार्गदर्शनामुळेच बँक आज प्रेरणादायी प्रगती करत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी या प्रसंगी काढले. सन २०२४-२५ अखेरची बँकेची सांपत्तिक स्थितीत खालीलप्रमाणे वाढ झाली आहे
३१ मार्च २०२४ आणि ३१ मार्च २०२५ अखेर भाग भांडवल ७०.८४ कोटी वरून ७७.२१ कोटी झाले (६.३७ कोटी वाढ).२५५३.०० कोटी वरून २८६२.०० कोटी (३०९.०० कोटी वाढ).कर्जे १६८५.०० कोटी वरून १८४६.०० कोटी (१६१.०० कोटी वाढ).एकूण व्यवसाय ४२३८.०० कोटी वरून ४७०८.०० कोटी (४७०.०० कोटी वाढ).ढोबळ नफा ५३.०० कोटी वरून ५५.०० कोटी (२.०० कोटी वाढ).ढोबळ एनपीए १३७.६५ कोटी वरून ₹१३५.४० कोटी (२.२५ कोटी घट).ढोबळ एनपीए ८.१७% वरून ७.३४% (एनपीए कमी झाला).निव्वळ एनपीए २.०२% वरून ०% (पूर्ण सुधारणा).सीआरएआर (CRAR)
१३.२५% वरून १३.३५% (०.१०% वाढ).भाग भांडवल, ठेवी, कर्जे आणि एकूण व्यवसाय वाढले आहेत.एनपीए कमी झाल्याने आर्थिक स्थैर्य सुधारले आहे.
ढोबळ नफ्यात वाढ मर्यादित असली तरी सकारात्मक आहे. सीआरएआर स्थिर राहून थोडी सुधारणा झाली आहे.
युध्दजन्य परिस्थिती, बँकांमधील व्याज दरातील तीव्र स्पर्धा, कच्या मालाचा अपुरा पुरवठा, नैसर्गिक आपत्ती, भौगोलिक राजकीय परिस्थिती या व यासारख्या अनेक कारणाने उद्योग, व्यापार, सेवा यामध्ये मंदीसदृश्य परिस्थिती होती. त्यामुळे सर्वच बँकांनी ठेवी व कर्जावरील व्याजदर वाढविले. अशा कठीण परिस्थितीतही बँकेने आपल्या प्रगतीचा आलेख कायम ठेवला असून, ढोबळ व निव्वळ एनपीएचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत कमी झालेले आहे. ढोबळ एनपीएचे प्रमाण ७.३४% व ०% निव्वळ एनपीएचे प्रमाण राखण्यामध्ये बँकेला यश प्राप्त झाले आहे ही अतिशय आनंदाची व सार्थ अभिमानाची बाब आहे. बँकेचा ०% निव्वळ एनपीए हा बँकेच्या कारकिर्दीतील अनेक वर्षापासूनचा ऐतिहासिक क्षण असून, सर्व संचालक, अधिकारी व बँकेचे कर्मचारी यांच्या अथक परिश्रमाची ही फलश्रुती आहे.१२:
बँकेने एकूण कर्जाच्या ५०% कर्ज म्हणजे रु. २५ लाखापर्यंतच्या लहान कजाँची खाती वाढवून लहान उद्योजक व विशेषतः लहान कर्जदारांना कर्ज पुरवठा वाढविण्यासाठी तसेच अग्रक्रम क्षेत्राला केल्या जाणाऱ्या कर्ज पुरवठयाची पुर्तता करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केल्यामुळे, बँकेला कर्जाचे अपेक्षित उद्दीष्ठ प्राप्त करण्यामध्ये यश प्राप्त झाले. पर्यायाने, भारतीय रिझर्व्ह बँकेने घातलेल्या निर्देशांचे बँकेने यथोचित पालन केलेले असल्याचे सूतोवाचही श्री स्वप्निल आवाडे यांनी सदर प्रसंगी केले.
इतकेच नव्हे तर, समाजातील प्रत्येक घटकास कर्ज योजनांचा लाभ मिळावा या उदात्त हेतूने बँकेने केंद्र शासनामार्फत नवीन युवा उद्योजकांना प्रेरणा देण्यासाठी कार्यान्वित केलेल्या पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना (PMEGP) तसेच मराठा समाजातील उद्योजकांना आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, विमुक्त जाती व भटक्या जमातींसाठी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, इतर मागासवर्गीय समाजासाठी (ओबीसी समाज) वित्त व विकास महामंडळ, वीरशैव लिंगायत समाजासाठी जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, गुरव समाजातील उद्योजकांना संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळामार्फत वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजनांसारख्या अनेकविध कर्ज सुविधा बँकेने कार्यान्वित केलेल्या असून, सर्वच स्तरातील ग्राहकांकडून प्रतिसाद चांगला मिळाला असून, येथून पुढील काळातही समाजातील घटकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन बँकेचे चेअरमन श्री स्वप्निल आवाडे यांनी केले.
तसेच बँकेने कर्नाटक राज्यामध्ये अथणी व हारुणेरी येथे दोन शाखा आर्थिक वर्षात कार्यान्वित केलेल्या असून, दोन्ही शाखा यशस्वीपणे चालू आहेत. तसेच बँकेने दि. १०.०३.२०२५ इ. रोजी जवाहर सहकारी बँक, हुपरी ही बँक आपल्या बँकेमध्ये विलीन करून घेवून, बँकेच्या एकूण ५४ शाखांच्या माध्यमातून बँक, कर्नाटक व महाराष्ट्र राज्यामध्ये दिमाखात कार्यरत असल्याचे गौरवोद्गार बँकेचे चेअरनम स्वप्निल आवाडे यांनी सदर प्रसंगी काढले.
ठेवीदारांचा बँकेवर असलेली विश्वासार्हता, कर्जदारांनी बिकट परिस्थितीमध्येही कर्जाची वेळेत केलेली परतफेड यामुळेच बँक इच्छित प्रगती करू शकली, त्यामुळे ठेवीदार, कर्जदार, सभासद व ग्राहक यांचे बँकेचे चेअरमन श्री स्वप्निल आवाडे यांनी मनःपूर्वक आभार मानले.
सदर प्रसंगी बँकेचे व्हा. चेअरमन सीए संजयकुमार अनिगोळ, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन सीए चंद्रकांत चौगुले, महेश सातपुते, बंडोपंत लाड, रमेश पाटील, शैलेश कित्तूरे, बाळकृष्ण पोवळे, द्वारकाधीश सारडा, शैलेश गोरे, सुभाष जाधव, बाबूराव पाटील, तात्यासो अथणे, अविनाश कांबळे, अॅड. सारंग जोशी तसेच बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य श्री राजू चव्हाण, योगेश पाटील व सचिन देवरुखकर आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शिरगावे, जनरल मॅनेजर किरण पाटील, दिपक पाटील, बँकेचे इतर पदाधिकारी, अधिकारी व सेवकवृंद उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800