अशोक स्वामी यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाद्वारे साजरा.
इचलकरंजी:
महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
अरुण विद्यामंदिर व संग्राम बालवाडी येथे विद्यार्थ्यांच्याहस्ते केक कापण्यात आला. माजी नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्याहस्ते विद्यार्थ्यांना खाऊ व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. कलानगर येथील गोशाळेत एक टेम्पो चारा प्रदान करण्यात आला. पुजारी मळा येथे शुभम केसरवाणी ग्रुपतर्फे वृक्षारोपण व सरबत वाटप करण्यात आले. अतिक समडोळे ई सेवा केंद्रातर्फे दोन दिवसांच्या आयुष्यमान कार्ड व आभा कार्ड काढण्याच्या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. शांतीनगर परिसरात प्रदीप मळगे यांच्या माध्यमातून पाणपोई उद्घाटन व सरबत वाटप झाले. व्यंकटेश्वरा सहकारी सूतगिरणी येथे अन्नदानाचा उपक्रम घेण्यात आला. अब्दूललाट येथील अनाथालय असलेल्या बालोद्यानात एकवेळचे भोजन व्यवस्था करण्यात आली.
या सर्व कार्यक्रमांना सुनिल तोडकर, दिलीप मुथा, युवराज माळी, अशोक पाटील, विश्वनाथ मेटे, धनराज खंडेलवाल, संग्राम स्वामी, राहूल जानवेकर, उमाकांत दाभोळे, आकाश स्वामी, नागेंद्र पाटील, सुनिल स्वामी, अरुण बंडगर, किरण स्वामी, कुमार माळी, अविनाश वेदांते, दीपक स्वामी, चिदानंद खोत, महेश खोजगे, किरण कदम, सलिम शिकलगार, रमेश कांबळे,योगेश बजाज,गजानन स्वामी, रवी माळी, राजू तोडकर, उमेश पाटील, शकील शेख, सचिन देशमाने, शशिकांत नेजे, रोहित गुरव, जय स्वामी, ईश्वर सावगावमठ, मुख्याध्यापक संजय कोळी, प्रशांत गुरव, असिफ वाटे,प्रविण नाईक,रामचंद्र गुरव शिक्षक शिक्षिका शिक्षकेत्तर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
अशोक स्वामींच्या वाढदिवसानिमित्त बालोद्यान मध्ये भोजन वितरित करण्यात आले.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800