पंचकल्याण महोत्सवात ७५ बटू वर मौजीबंधन संस्कार,३ लाखाची रक्कम सामाजिक कार्यास.
इचलकरंजी :
येथील दिगंबर जैन बोर्डिंग परिसरात सुरू असलेल्या पंचकल्याणी प्रतिष्ठा महामहोत्सवात रविवारी 75 बटूवर मौजीबंधन संस्कार करण्यात आले. यानंतर या बटूंची परिसरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.
पंचकल्याणिक महोत्सवाच्या आज पाचव्या दिवशी सकाळी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. त्यानंतर महोत्सवाचे यजमानांची हत्तीवरून मंदिरात आगमन झाले. मुख्य सभा मंडपात मौजी बंधन संस्कार आणि कुमारिका वृत्त संस्कार झाले. यावेळी आचार्य 108 श्री जीनसेन मुनी महाराज, आचार्य श्री 108 चंद्रप्रभ सागर महाराज, क्षुल्लकरत्न परमपूज्य श्री १०५ समर्पण सागर महाराज श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी नांदणी यांच्या पावन सानिध्यामध्ये व प्रतिष्ठाचार्य पंडित डॉ. सम्मेद उपाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली मौजी बद्दल संस्कार करण्यात आले. यावेळी बोलताना श्री चंद्रप्रभ सागर महाराज म्हणाले, “आज खरी संस्काराची गरज आई वडिलांच्या वर आहे मुलांच्यावर काय संस्कार करायचे याचेच ज्ञान आजच्या आई-वडिलांच्या जवळ नाही. त्यामुळे विशेषता आईंच्यावर संस्कार होणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे श्यामची आई आपल्या मुलावर संस्कार केले त्याप्रमाणेच नव्या पिढीला पुन्हा एकदा संस्कार करण्याची गरज निर्माण झाली आहे. ज्या बटूवर आज संस्कार झाले त्यांनीही सप्त व्यसनाचा आजन्म त्याग करावयाचा आहे. व्यसनापासून दूर राहून आपले आयुष्य सुखी व पुण्यवान करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यानंतर या बटूंची सर्वाधिक मिरवणूक परिसरातून काढण्यात आली होती त्यांचे ठीक ठिकाणी स्वागत करण्यात आले.
दुपारी महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. त्यामध्ये मंदिरात लघुशांतीक पीठ यंत्र आराधना, नित्यविधी, विश्वशांती महायज्ञ, तीर्थंकर आहार चर्या, पंचामृत अभिषेक, दीक्षा कल्याण असे कार्यक्रम पार पडले. सायंकाळी ज्वालामालिनी मातेच्या प्रतिमेची हत्तीवरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर ज्वाला मालिनी मातेची अलंकार पूजा आणि संगीत आरती चा कार्यक्रम झाला.
—-
पूजेतील रक्कम सामाजिक कार्यासाठी
पंचकल्याणिक पूजेमध्ये होणाऱ्या खर्चातील काही भाग सामाजिक शैक्षणिक कार्यासाठी वापर करावा असे आवाहन दक्षिण भारत जैन सभेने केले होते. त्याप्रमाणे आज श्री समर्पण सागर महाराज यांनी मौजीबंधन संस्कार वेळी होणाऱ्या सवालाची रक्कम येथील जैन सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळ संचलित सन्मती मतिमंद विकास केंद्रास देण्यात येईल अशी घोषणा केली. यावेळी कुमार तेरदाळे यांनी यासाठी एक लाख रुपयांची देणगी जाहीर केली. तर विवान बलवान, विशाल बलवान, विवेक शेट्टी यांनी घेतलेल्या सवालाची रक्कम ही शाळेस देण्यात येणार आहे यातून सुमारे तीन लाख रुपयाहून अधिक निधी सामाजिक उपक्रमास जाणार आहे.
येथे सुरू असलेल्या पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवात रविवारी बटुवर मौजी वंदन संस्कार करताना त्यागी वृंद

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800