सहकार समृद्धी बाबत सी ए मिलिंद काळेंचे व्याख्यान.
इचलकरंजी
शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी आपटे वाचन मंदिर येथे वसंत व्याख्यानमालेत पाचवे पुष्प कॉसमॉस बँकेच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांनी गुंफताना सहकार समृध्दीचे आधुनिक सूत्र या विषयी गुंफताना त्यांनी कॉसमॉस बँक ही देशातील २ नंबरची ११८ वर्षाची बँक आहे. व्यवस्थापन मंडळाचे कार्य म्हणजे काय? कशा करता? आपण बरोबर काम करतो आहोत ना? याकडे लक्ष दयायला हवे, २००१/०२ साली २१०० बँका होत्या पण आज १४०० आहेत. त्यातून R.B.I ५०० किंवा १०० च ठेवणार आहे. सध्या १०० वर्षापूर्वीच्या देशात १०० बँका आहेत. सहकारी क्षेत्रातील हस्तांतरणाने वाईट परीणाम झाला. सहकारी बँकांना चांगले ट्रस्टी न मिळाल्याने त्या बुडाल्या. चांगले चालण्यासाठी नफा हा ८० ते ९०% त्यातच मुरवावा लागतो. सगळा वाटून चालत नाही. चुकीच्या किंवा अती चांगल्या लोकांच्या हातात संस्था गेल्यामुळे कालानुरुप बदलही गरजेचे असतात. अमूल दुधाचे उदाहरण देऊन सविस्तर माहिती दिली. त्रिभूवनदास युनव्र्व्हिसिटीत शिकुन येणारे यापुढे संचालक व्हावेत. विश्वासासाठी त्या, त्या ठिकाणी एक्स्पर्ट लोक नेमणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.
नेमलेल्या तज्ज्ञाच्या आहारी जाता कामा नये. त्यांच्यात संचालकांचा हस्तक्षेप नसावा. तसेच संचालक हे लोकसंपर्कात कमी पडता कामा नयेत. सीईओ नी आपले काम चोख करावे. मध्यंतरी बँका बुडाल्या मराठा बँक, न्यू इंडिया बँक या बुडण्याचे कारण संतुलीत सहकार न राहता दोघांनाही एकमेकांच्या कामात हस्तक्षेप केला. तज्ज्ञ व्यक्ती नेमल्यावर ज्याचे त्यांना काम करु दयावे. सामाजिक भान हवे. सहकारातून समृध्दी हवी सर्व व्यावसायीकांना बरोबर घेऊन जाणे हवे. निष्काळजीपणा नको बॅलन्सशिट R..B.I ला दाखवायला एक व प्रत्यक्ष व्यवहाराची एक असे पंजाब नॅशनल बँकेने केल्याने ती बुडाली. लोकांच्या हिताच्या गोष्टी करण्याची जबाबदारी सहकारामध्ये आहे. समाजासाठी थोड काही तरी देण लागतो हा हातभार हवा. आर्थिक समृद्धीसाठी सहकारासारखा दुसरा पर्याय नाही फक्त कामाची विभागणी झाल्यावर एकमेकात हस्तक्षेप नको.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीपूजना नंतर पाहुण्यांचे स्वागत संस्थेच्या अध्यक्ष सौ. सुषमा दातार यांनी केले. सौ. वैशाली आवाडे, अशोक पाटील (सीईओ सन्मती बँक), सुनिल मराठे (सुतंतू सायझर्स) यांचे स्वागत मिलिंद काळे यांनी केले. पाहुण्यांची ओळख व आभारप्रदर्शन संचालक प्रा. डॉ. सुजीत सौंदत्तीकर यांनी केले. यावेळी कार्यक्रमास रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800