वंचितांसाठी आयुष्य वेचणारे – डॉ. गिरीश कुलकर्णी.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

वंचितांसाठी आयुष्य वेचणारे – डॉ. गिरीश कुलकर्णी.

इचलकरंजी – आपटे वाचन मंदिर येथे वसंत व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प गुंफतांना डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी आशयसंपन्न जगण्याची प्रकाशवाट शोधताना ते म्हणाले आव्हाने ही चीन, बांगलादेश, पाकिस्तान ही सीमेलगतची असली तरी सीमेच्या आत तुम्ही अनेक आव्हानांशी लढतो आहोत. सावित्रीबाई, न्या. रानडे, स्वामी विवेकानंद यांनी समाजाचा जाच देखील सहन केला संघर्षातून ते हिरो बनले.
आज २० लाख मुलींची जन्मपूर्व हत्या होते. २ लाख अल्पवयीन मुले, मुली विकले जातात. निर्भयानंतर कायदे केले. एक साक्षीदाराने जेसिका बालला सोडविले. विविध उदाहरणाव्दारे मुलींच्याकडून देहविक्रय कसा करुन घेतला जातो ते सांगीतले. १८ हजार बाल कामगारांना शिकविले. माणूस बदलला तर विश्व बदलेल सर्व संसाधन इतरांच्या उपयोगी पडावीत. त्यांच्या परिस्थितीत बदलासाठी काय करायच ? नात जोडल तर भेदभाव कमी होतील वेदनेला मदत देणारे हात पुढे यायला. हवेत ७०० प्रकरणांमध्ये जी वेश्या आहे तिची मुलगी सध्या वेश्या होत नाही. सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक अत्याचार करीत असतात. १९९१ पासून एच. आय. व्ही. सेंटर सुरु केले. महिलांसाठी हिंमतग्राम पुर्नवसन करत मानसंग्राम प्रकल्पातून देशातील ६०० रुग्ण बरे करुन घरी पाठविले. ११ वर्षाच्या बालमातांवर घरचे लोक अत्याचार करतात हे दिसून आले. ८०० मुलींचे बालविवाह रोखले. संघर्ष करावा लागतो. ७०हून अधिक संस्था हे काम करत आहेत.
०.५% पर्यंत एच. आय. व्ही आणला आहे. मनोरूग्ण फिरताना दिसतात त्यांना बरे करुन स्वगृही पाठविले. स्वप्ने पाहण्यात मर्यादा नाहीत. २०१३ मध्ये लोकसहयोगातून टाकून दिलेल्या मुलांना स्नेहालय मध्ये आणले. एक कुटुंब समजून सर्वांना नवे आयुष्य दिले. बालभवनही ते चालवितात. तळाताली स्त्रिया मुले जी वंचीत आहेत समाजाने त्रास दिलेली आहेत अशांना सन्मानाने जगण्याची उमेद देणारे डॉ. गिरीश कुलकर्णी व त्यांच्या डॉ. पत्नी काम करीत आहे. अ.भा.वि. प.च्या संस्कारामधून हे सर्व काम त्यांना संघर्षातून शक्य झाले.
प्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन झाले. डॉ. गिरीश कुलकर्णी यांचे स्वागत संस्थेच्या अध्यक्ष सौ. सुषमा दातार यांनी केले. प्रायोजक श्री. विठ्ठलराव डाके यांचे स्वागत डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी केले. पाहुण्यांची ओळख व आभार संचालक श्री. काशिनाथ जगदाळे यांनी मानले. बहुसंख्येने श्रोते हजर होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More