संग्राम गायकवाड यांची प्रकट मुलाखत

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

संग्राम गायकवाड यांची प्रकट मुलाखत

इचलकरंजी:
भारतीय संस्कृतीमधील उदार सोशिक आणि सहिष्णु परंपरा ही भारतीयत्व टिकवून ठेवणारा वारसा असून तो दख्खनी भाषेतून एकेकाळी परस्परांना बंधुभाव आणि प्रेमाने सहजीवनाची शिकवण देत होता त्याचे पुनरुज्जीवन करीत नव्या युगातील लोकधर्माचे संवर्धन केल्यास सामाजिक सलोखा निर्माण होईल असा विश्वास मनसमझावनकार व प्रधान आयकर आयुक्त मा. संग्राम गायकवाड यांनी येथील आपटे वाचन मंदिराच्या वसंत व्याख्यानमालेतील तिसरे पुष्प गुंफतांना व्यक्त केला.
संस्थेचे संचालक श्री. अशोक केसरकर यांनी घेतलेल्या गायकवाड यांच्या मुलाखतीत बालपणापासून त्यांचा COEP मधील इंजिनिअरींगची पदवी आणि UPSC तून आयकर आयुक्तापर्यंतचा प्रवास त्यांनी सविस्तर मांडला. सामान्यांना भयप्रद वाटणाऱ्या इनकमटॅक्स खात्याविषयी बोलताना त्यांनी करप्रणाली, आधुनिक संगणकिकरण तसेच महसूल विषयक माहिती कथन केली.
यानंतर स्वयंम् सेवी संस्थेतून काम करताना लोकसेवेची आवड आणि वाचन लेखनाचा छंद कसा जोपासला गेला हे गायकवाड यांनी आपल्या ओघवत्या भाषेत सांगितले. आयकर खात्यात वेगवेगळ्या विभागातून चालणारी कामे, जबाबदाऱ्या, अहवाल अशी मनोरंजक माहिती आटपाट देशातील गोष्टी व्दारे कादंबरी स्वरुपात मांडल्याचे आणि त्यास लोकप्रियता मिळाल्याचे सांगितले. यानंतर १६ व्या शतकातील सुफी परंपरेचा आणि अनेक भाषांच्या सरमिसळीतून तयार झालेल्या दख्खनी भाषेचा उल्लेख करुन रामदास, कबीर. संत नामदेव यांचा उल्लेख करुन या भाषेने त्या काळात साधलेले सौहार्द त्यांनी सोदाहरण सांगून या संस्कृतिचे अवलंबन टोकदार अस्मिता आणि कट्टरवाद सौम्य करण्यास निश्चित उपयुक्त ठरेल, असा विश्वास गायकवाड यांनी व्यक्त केला.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीपूजना नंतर पाहुण्यांचे स्वागत संस्थेच्या अध्यक्ष सौ. सुषमा दातार यांनी केले. प्रायोजक श्री. राहुल खंजीरे यांचे स्वागत संग्राम गायकवाड यांनी केले. पाहुण्यांची ओळख, मुलाखत व आभारप्रदर्शन संचालक श्री. अशोक केसरकर यांनी केले. यावेळी कार्यक्रमास रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More