ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत ‘मिशन झिरो ड्रग्ज’ आणि गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन कार्यक्रम

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत ‘मिशन झिरो ड्रग्ज’ आणि गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन कार्यक्रम

इचलकरंजी – मिशन झिरो ड्रग्ज आणि आगामी गणेश उत्सवाच्या इचलकरंजीतील दोन शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचे दुष्परिणाम आणि सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

पहिला कार्यक्रम व्यंकटराव हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे पार पडला. मुख्याध्यापक कांबळे मॅडम, श्वेता जैन (जैन फाउंडेशन) आणि सपोनि विजय गोडसे यांनी NDPS कायदा, अंमली पदार्थाचे शरीरावर होणारे दुष्परिणाम, सायबर गुन्हे, सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकूर व डायल ११२ याबाबत सखोल मार्गदर्शन केले. यामध्ये सुमारे ४०० ते ४२५ विद्यार्थी व पालक सहभागी झाले.

दुसरा कार्यक्रम व्यंकटेश्वर इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, कबनूर येथे झाला. यावेळी मुख्याध्यापक स्मिता बेडक्याळे, चेअरमन दीपक राठी, शांतता कमिटी सदस्य आणि सपोनि विजय गोडसे यांनी विद्यार्थ्यांना सदर विषयांवर मार्गदर्शन केले. यामध्ये सुमार ४०० विद्यार्थी सहभागी झाले.

या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये कायदेशीर जागरूकता निर्माण करण्यात आली.

सपोनि विजय गोडसे यांनी झिरो ड्रग्ज अंतर्गत मार्गदर्शन केले

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा