इचलकरंजीत वादातून परस्परविरोधी तक्रारी; दोन्ही बाजूंनी अदखलपात्र गुन्हे दाखल
इचलकरंजी – शहरातील व्यंकटराव हायस्कूल रोडजवळील राज ज्यूस सेंटरसमोर आपसात वादातून दोन गटांत मारहाणीचा प्रकार घडल्याने परस्परविरोधी तक्रारींवरून इचलकरंजी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या प्रकरणात आसिफ मुनवरअली बागवान (वय २२, रा. जवाहरनगर, इचलकरंजी) यांनी फिर्याद दिली असून, त्यांच्या आईने ज्यूस सेंटरसमोर मोटारसायकल लावल्याच्या कारणावरून वाद झाला. त्यातून रियाज, सोफिया, जुनेद आणि आजीम रियाज बागवान या चौघांनी त्यांना व त्यांच्या आईला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दुसऱ्या प्रकरणात फिर्यादी जुनेद रियाज बागवान (वय ३० रा. सुतार मळा, इचलकरंजी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी मुनेश, आसिफ, फैयाज आणि अय्याज बागवान यांनी मोटारसायकल लॉक न करण्याच्या कारणावरून वाद घालून फिर्यादीसह त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण केली.
दोन्ही प्रकरणांचा तपास पोहेकॉ पाथरवट करत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







