ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत शनिवारी होड्यांच्या शर्यती

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत शनिवारी होड्यांच्या शर्यती.

इचलकरंजी
इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीने यंदा शनिवार 9 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता पंचगंगा नदीपात्रात होड्यांच्या शर्यती घेण्यात येणार आहेत, अशी माहिती इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कलागते यांनी दिली.
प्रतिवर्षी क्रांती दिनानिमित्त इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीन भव्य होड्यांच्या शर्यतीचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेत इचलकरंजीसह कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील बोट क्लब यांचा सहभाग असतो. यंदा शनिवारी (9 ऑगस्ट) दुपारी 4 वाजता ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेचा शुभारंभ सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे यांचे अध्यक्षतेखाली व आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तर माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर व क.आ.इचलकरंजी जनता बँकेचे चेअरमन स्वप्निल आवाडे यांच्या हस्ते बक्षिस वितरण समारंभ होणार आहे. याप्रसंगी विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे 21001/-, 15001/-, 11001/- व 7001/- अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. तर मध्यवर्ती सहकारी हातमाग विणकर संघाचे चेअरमन प्रकाश दत्तवाडे यांच्यातर्फे फिरती चांदीची गदा देण्यात येणार आहे, शर्यती पाहण्यासाठी शौकिनांनी मोठ्या संख्येने यावे, असे आवाहन उपाध्यक्ष बाबासो उर्फ नंदू पाटील, सागर मगदूम, अहमद मुजावर यांनी केले आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा