ICHMH51NEWS.IN
9921600800

सुळकुड योजनेसाठी महाविकास आघाडीची कावड यात्रा व अभिषेक

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सुळकुड योजनेसाठी महाविकास आघाडीची कावड यात्रा व अभिषेक

इचलकरंजी
इचलकरंजी शहर महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र सरकारच्या विद्यमान आमदार व खासदार यांच्याकडून इचलकरंजी साठी मंजूर झालेले सुळकुड पाणी योजने बाबत होत असलेल्या दिरंगाई व होत चाललेली चाल ढकल याबाबत सर्वांना सद्बुद्धी मिळावी म्हणून लोकमान्य टिळक पुतळा राजवाडा येथून कावड यात्रेने जाऊन इचलकरंजी शहराचे ग्रामदैवत  गावभागातील महादेव मंदिर येथे  श्री शंभू महादेवाला सुळकुड पाण्याचा अभिषेक घालण्यात आला.  यावेळी श्री मदनराव कारंडे, संजय कांबळे, सागर चाळके, प्रकाश मोरबाळे, सयाजी चव्हाण, भरमा कांबळे,  सदा मलाबादे, वसंत कोरवी,  उदयसिंह पाटील, हेमंत वनकुंद्रे, बाबासाहेब कोतवाल, राजू आलासे, मालकरी लवटे, नंदकिशोर जोशी,युवराज शिंगाडे, योगेश कांबळे, नागेश शेजाळे, अभिजीत रवंदे, अण्णा कांबळे, राजू किनेकर, राजन मुठाणे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर कावड यात्रेचे नियोजन नगरसेवक अमरजीत जाधव यानी केले होते
कावड यात्रेत सहभागी मदन कारंडे,सागर चाळके,संजय कांबळे, सयाजी चव्हाण,सदा मलाबादे,अमरजीत जाधव व इतर
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा