ICHMH51NEWS.IN
9921600800

गद्रे दत्त मंदिर समोरील भिंत धोकादायक स्थितीत; चिमुकल्या तनिष्काची प्रशासनाला भावनिक साद

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गद्रे दत्त मंदिर समोरील भिंत धोकादायक स्थितीत; चिमुकल्या तनिष्काची प्रशासनाला भावनिक साद व्हिडीओ-https://youtube.com/shorts/GrJFKZarJXQ?si=IkdYD1zxVBeP5Mpw

 

इचलकरंजी :
शहरातील गद्रे दत्त मंदिर समोरील सुंदर बागेची भिंत सध्या अत्यंत धोकादायक स्थितीत असून, कोणत्याही क्षणी अपघात घडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कु. तनिष्का वर्धमान हावले या चिमुकल्या मुलीने स्वतःचा ऑडिओ व्हिडिओ सहित संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित करत, भिंतीची तातडीने डागडुजी करण्याची भावनिक मागणी केली आहे.

तनिष्काच्या या प्रामाणिक आवाहनाला शहरातील नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. तिचा निरागस आवाज आणि सुरक्षिततेची चिंता प्रशासनाच्या कानावर पोहोचावी, अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त केली जात आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, भिंत जीर्णावस्थेत असल्याने पादचारी, खेळणारी मुले तसेच वाहतुकीसाठी धोका निर्माण झाला आहे. संबंधित विभागाने तात्काळ काम हाती घेऊन दुर्घटना टाळावी, अशी मागणी होत आहे.
आता प्रशासन या चिमुकल्या नागरिकाच्या विनंतीला कितपत प्रतिसाद देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा