शिरढोण येथील श्रीकृष्ण मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी सप्ताहास उत्साहात प्रारंभ
इचलकरंजी
शिरढोण येथे श्रीकृष्ण मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी सप्ताहास भावपूर्ण वातावरणात उत्साहात प्रारंभ झाला. यानिमीत्त सप्ताहभर अखंड नामजप, श्री ज्ञानेश्वरी पारायण, भजन, प्रवचन यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. हे सोहळ्याचे ३१ वे वर्षे आहे.
शिरढोण इथं श्रावण पायी दिंडी सोहळा समिती, श्रीकृष्ण भजनी मंडळ, श्री हरी भजनी मंडळ आणि श्री हरी महिला भजनी मंडळाच्यावतीनं दरवर्षी श्रीकृष्ण मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमीत्त सप्ताहाचं आयोजन केलं जातं. रविवारी मान्यवरांच्या उपस्थितीत विधीवत पुजा करुन या सप्ताहाला प्रारंभ झाला. यावेळी सोहळा समिती आणि भजनी मंडळाच्या पदाधिकार्यांसह ग्रामस्थांच्या उपस्थितीत आरती, अखंड नामजप, भजन आणि श्री ज्ञानेवश्वरी पारायणास भावपूर्ण वातावरणात उत्साहात प्रारंभ झाला. सप्ताहकाळात अखंड नामजप, दुपारी भजन आणि सायंकाळी हरीपाठ, प्रा. अशोक दास यांचं प्रवचन होणार आहेे. १५ ऑगस्ट रोजी रात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव होणार असून १६ ऑगस्ट रोजी दिंडी सोहळा, काल्याचं किर्तन आणि महाप्रसादानं या सप्ताहाची सांगता होणार आहे. श्रावण पायी दिंडी सोहळ्यात सहभागी झालेले शिरढोणसह पंचक्रोषीतील वारकरी, भक्तगण या दिंडी सोहळ्यात सहभागी होत असतात.
जन्माष्टमी निमित्त कार्यक्रमास प्रारंभ करताना भाविक
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







