ICHMH51NEWS.IN
9921600800

श्री आदिनाथ बँकेच्या चेअरमन पदी बाळासाहेब पारीसा चौगुले यांची बिनविरोध निवड

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

श्री आदिनाथ बँकेच्या चेअरमन पदी बाळासाहेब पारीसा चौगुले यांची बिनविरोध निवड

इचलकरंजी :
येथील श्री आदिनाथ को-ऑपरेटिव्ह बँक लि., इचलकरंजी च्या चेअरमन पदासाठीची निवड बँकेच्या प्रधान कार्यालयात झाली. या निवड प्रक्रियेस मा. डॉ. एस. एन. जाधव (उपनिबंधक, सहकारी संस्था, हातकणंगले) अध्यक्षस्थानी होते.

चेअरमन पदासाठी संचालक मा. श्री. श्रेणिक मगदूम यांनी मा. श्री. बाळासाहेब पारीसा चौगुले यांचे नाव सुचविले, तर त्यास संचालक मा. श्री. अनिल बम्मण्णावर यांनी अनुमोदन दिले. एकमेव उमेदवार म्हणून श्री. चौगुले यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

निवडीनंतर डॉ. एस. एन. जाधवसो आणि बँकेचे उपाध्यक्ष यांनी नूतन चेअरमन श्री. चौगुले यांचा सत्कार केला. तसेच माजी चेअरमन सुभाष काडाप्पा यांचाही सन्मान डॉ. जाधवसो यांच्या हस्ते करण्यात आला. प्रारंभी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जयकुमार उपाध्ये यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.

कार्यक्रमात बँकेच्या वाटचालीत सहकार महर्षी मा. खा. कल्लाप्पाणा आवाडे (दादा) आणि माजी मंत्री प्रकाशराव आवाडे (आण्णा) यांच्या मोलाच्या सहकार्याचा उल्लेख करण्यात आला.

आपल्या मनोगतात नूतन चेअरमन श्री. चौगुले यांनी बँकेचे संस्थापक चेअरमन स्व. आप्पासो मगदूम यांना अभिवादन करून बँकेची कार्यक्षमता व गुणवत्ता याबाबत आत्मविश्वास व्यक्त केला. तसेच बिनविरोध निवडीबद्दल सर्वांचे आभार मानले.

या सभेस माजी चेअरमन मा. सुभाष काडाप्पा, विद्यमान उपाध्यक्ष चंद्रकांत मगदूम, संचालक कुंतिलाल पाटणी, मधुकर मणेरे, सुदर्शन खोत, श्रेणिक मगदूम, अनिल बम्मण्णावर, संपत कांबळे, गुरुनाथ हेरवाडे, सुकुमार पोते, सौ. मंगल देवमोरे, सौ. अनिता चौगुले, सीईओ जयकुमार उपाध्ये, प्रशासन अधिकारी श्री. जे. बी. चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते. शेवटी संचालक अनिल बम्मण्णावर यांनी आभार मानले.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा