नृत्यदर्पण कला अकादमीचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न.
इचलकरंजी
गुरुपौर्णिमेनिमित्त नृत्यदर्पण कला अकादमी आयोजित ‘नृत्यसंध्या’ हा कार्यक्रम ४ ऑगस्ट रोजी आपटे वाचन मंदिर येथे उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कथ्थक नृत्य अलंकार सौ. सायलीताई होगाडे व कथ्थक विशारद सौ. प्रीतीताई कट्टी यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात ही दीप प्रज्वलन व गुरुवंदनेने झाली. विविध वयोगटातील मुली व महिला विद्यार्थिनींनी कथ्थक नृत्यातील ताल – त्रिताल,झपताल, छोटी सवारी तसेच शास्त्रीय व निमशास्त्रीय गाण्यावर तालबद्ध सादरीकरण केले.
कार्यक्रमाची पढन्त – संस्थापिका सौ. सायली चोथे – अग्रवाल, हार्मोनिअम – श्री. श्रीधर पाटील सर, तबला – राजू पाटील सर यांची साथसंगत मिळाली, सूत्रसंचालन डॉ. सौ. तेजश्री कुंभार यांनी केले.
नृत्यसंध्या कार्यक्रमावेळी उपस्थित कलाकार
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







