ICHMH51NEWS.IN
9921600800

श्रीमंत गंगामाई मध्ये ७९वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

श्रीमंत गंगामाई मध्ये ७९वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

इचलकरंजी:
श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, इचलकरंजी मध्ये ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला.यावेळी संस्थेचे विश्वस्त मा.श्री सुरेंद्रजी बांगड साहेब यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण झाले.त्यानंतर प्रशालेच्या  गीत मंचाच्या विद्यार्थिनी व संगीतशिक्षिका सौ रानडे मॅडम यांनी झेंडा गीत व महाराष्ट्र गीत सादर केले.
              प्रशालेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.ए.एस. काजी मॅडम यानी याप्रसंगी मुलींना मार्गदर्शन केले.त्या म्हणाल्या विद्यार्थिनींनी  आयुष्यात प्रामाणिकपणा व स्वतःच्या कामावर पूर्ण आत्मविश्वास जपून ठेवला तर त्या नक्कीच आयुष्यात यशस्वी होतील.प्रमुख अतिथी मा.श्री सुरेंद्रजी बांगड साहेब यांनी विद्यार्थिनींना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
         याप्रसंगी सन २०२४-२५ या वर्षी नवसाक्षर परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेल्या ज्येष्ठ बंधू भगिनींचा प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
        स्कॉलरशिप परीक्षेत राज्यात दहावी व एमटीएस परीक्षेत राज्यात चौथी अशा क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल कु.संस्कृती संतोष आबाळे या विद्यार्थिनीचा व तिच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.
        याप्रसंगी स्कूल कमिटी चेअरमन मा.श्री मारुतराव निमणकर साहेब उपस्थित होते. तसेच मुख्याध्यापिका मा.सौ.ए.एस.काजी मॅडम, उपप्राचार्य श्री. व्ही. जी. पंतोजी सर, पर्यवेक्षिका सौ. व्ही. एस. लोटके मॅडम , पर्यवेक्षक मा. श्री. एस. एस. कोळी सर  तसेच ज्येष्ठ शिक्षक श्री. डी. डी. कोळी सर , जिमखाना प्रमुख श्री. बी. एस. माने सर,विभाग प्रमुख श्री पाटील सर , प्रशालेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी सर्व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी यांची उपस्थिती लाभली.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा