हातकणंगले व निमशिरगाव शेतकऱ्यांना दिवसा शेतीपंपांसाठी वीज उपलब्ध
हातकणंगले:
खासदार धैर्यशील माने व माजी नगरसेवक रणजीत पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हातकणंगले व निमशिरगाव परिसरातील शेतकऱ्यांना दिवसा शेतीपंपांसाठी वीजपुरवठा करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.
यामुळे 18 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट 2025 या कालावधीत शेतकऱ्यांना सोमवार ते रविवार दरम्यान सकाळी 8.55 ते सायंकाळी 4.55 वाजेपर्यंत अखंड वीज उपलब्ध होणार आहे. दिवसा वीजपुरवठा झाल्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठा दिलासा मिळणार असून शेतीकामात सोय होणार आहे.
खासदार धैर्यशील माने व माजी नगरसेवक रणजीत पाटील यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांना दिवसा शेतीपंपाची वीज मिळावी यासाठी आम्ही गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न करत होतो. अखेर या प्रयत्नांना यश आले आहे. मात्र हे वेळापत्रक कायमस्वरूपी व्हावे यासाठी आम्ही वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करत आहोत.”
शेतकरी बांधवांनी या निर्णयाचे स्वागत केले असून महावितरण कोल्हापूर, जयसिंगपूर व हातकणंगले कार्यालयातील अधिकारी वर्गाच्या तत्परतेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







