दत्ताजीराव कदम लॉ कॉलेजमध्ये प्रवेशासाठी सुवर्णसंधी
इचलकरंजी :
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचालित दत्ताजीराव कदम लॉ कॉलेज, इचलकरंजी हे आधुनिक भौतिक व शैक्षणिक सुविधांनी सुसज्ज असे विधी महाविद्यालय चालू शैक्षणिक वर्ष जून २०२५-२६ पासून सुरू झाले आहे.
सदर महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेची जबाबदारी CET सेल मार्फत पार पाडली जात आहे. यामध्ये B.A. LL.B. (५ वर्षे) अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया २१ ते २३ ऑगस्ट २०२५ दरम्यान होणार असून, LL.B. (३ वर्षे) अभ्यासक्रमासाठी २४ ते २७ ऑगस्ट २०२५ दरम्यान प्रक्रिया पार पडणार आहे.
ज्यांनी अद्याप रजिस्ट्रेशन केलेले नाही किंवा पसंतीनुसार महाविद्यालय न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयात विशेष नोंदणी व विद्यार्थी सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी निश्चित तारखांना महाविद्यालयात भेट द्यावी, असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. चंद्राणी बागडी यांनी केले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







