हजरत सिकंदर शहा दर्गा येथे आज
गुलजार नाझा यांचा कव्वालीचा कार्यक्रम
इचलकरंजी:
इचलकरंजी शहरच नव्हे तर पंचक्रोशीतील सर्वधर्मिय भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या हजरत सय्यद सिकंदर शहा दरीपीर यांच्या उरुसानिमित्त शनिवार 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी प्रसिध्द कव्वाल गुलजार नाझा यांचा कव्वालीचा कार्यक्रम होणार आहे.
दरवर्षी हजरत सय्यद सिकंदर शहा दरीपीर यांचा उरुस विविध कार्यक्रम आणि उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदाही मंडप चढविणे, गंध लेपन, लंगर (महाप्रसाद) असे कार्यक्रम पार पडले. तर बुधवारी उरुसाचा मुख्य दिवस झाला. उरुसा निमित्त शनिवारी मुंबईचे प्रसिध्द कव्वाल गुलजार नाझा यांचा कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे व क.आ.इचलकरंजी जनता बँकेचे चेअरमन स्वप्निल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहून कव्वालीचा आनंद घ्यावा, असे आवाहन उरुस कमिटीचे अध्यक्ष तनवीर मुजावर, याकुब मुजावर व पापालाल मुजावर यांनी केले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







