व्यंकटराव हायस्कूलमध्ये जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात संपन्न
इचलकरंजी :
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर तसेच इचलकरंजी महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय शासकीय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धा २०२५ व्यंकटराव हायस्कूल येथे उत्साहात पार पडल्या.
या स्पर्धेचे उद्घाटन इचलकरंजी मनपा आयुक्त तथा प्रशासक मा. पल्लवी पाटील मॅडम यांच्या शुभहस्ते झाले. त्यांच्या समवेत अति. आयुक्त मा. सुषमा शिंदे-कोले मॅडम, मनपा क्रीडा अधिकारी सूर्यकांत शेटे, इचलकरंजी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री. दिपक राशिनकर साहेब, सचिव श्री. कौशिक मराठे, प्रा. शेखर शहा, मुख्याध्यापक शंकर पोवार सर, सहा. क्रीडा अधिकारी संजय कांबळे तसेच सचिन खोंद्रे, आकाश माने, राहुल कुलकर्णी सर, बंडगर सर, विजय गुरव सर उपस्थित होते.
स्पर्धेला जिल्ह्यातील विविध शाळांमधील खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. उपस्थित मान्यवरांच्या शुभेच्छा व मार्गदर्शनाने खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावला.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक उपमुख्याध्यापक श्री. खराडे सर यांनी केले. सूत्रसंचालन श्री. बरगाले सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री. माळी सर यांनी मानले.
या स्पर्धेतून पुढे निवड झालेल्या खेळाडूंच्या माध्यमातून इचलकरंजीचा जिल्हास्तरीय प्रतिनिधित्व निश्चित होणार आहे.
बुद्धिबळ स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी आयुक्त पल्लवी पाटील व अति आयुक्त सुषमा शिंदे
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







