ICHMH51NEWS.IN
9921600800

२७ H.P. पेक्षा जादा वीज वापरल्यास पारंपारिक मल्टीपार्टी कनेक्शनधारकांना महावितरणची नोटीस लागू शकते-पॉवरलूम असोसिएशन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

२७ H.P. पेक्षा जादा वीज वापरल्यास पारंपारिक मल्टीपार्टी कनेक्शनधारकांना महावितरणची नोटीस लागू शकते-पॉवरलूम असोसिएशन

इचलकरंजी:
महावितरण कंपनीने नुकतेच सर्व जिल्ह्यातील मुख्य अभियंत्यांना परिपत्रक जारी करून पारंपारिक मल्टीपार्टी कनेक्शनधारक यंत्रमाग उद्योजकांना इशारा दिला आहे. १ ऑगस्ट २०२५ रोजी काढलेल्या या सर्क्युलरनुसार, २० किलोवॅट (२७ H.P.) पेक्षा जास्त भाराचा वापर तीन वेळा झाल्यास ते मंजूर भार अटीचे उल्लंघन मानले जाईल आणि अशा ग्राहकांचे कनेक्शन २७ H.P. वरील वर्गवारीत नेले जाईल.

पारंपारिक मल्टीपार्टी कनेक्शनमध्ये वीज वापराचे रिडींग प्रत्यक्ष व्यक्ती जाऊन घेतले जाते. या कनेक्शनना ToD (वेळेनुसार दर), पॉवर फॅक्टर, पेनल्टी-इन्सेंटीव्ह व नवीन नियमाप्रमाणे KvAh रिडींग लागू होत नाही. त्यामुळे महसुली नुकसान होत असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. यामुळे संबंधित कारखानदारांनी वीज वापर २७ H.P. खाली ठेवणे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांना जादा दर, दंड, ToD व PF लागू होतील.

दरम्यान, क्युबिकल मल्टीपार्टी कनेक्शनधारकांना मात्र घाबरण्याचे कारण नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कारण या कनेक्शनचे रिडींग डेटा एन्ट्रीद्वारे घेतले जाते. त्यांना नियमानुसार २७ H.P. खालील ५० पर्यंत कनेक्शन घेण्याची परवानगी आहे. मात्र त्यांच्यावर एकत्रित वीज गळती, KvAh रिडींग, PF व ToD लागू असून, जादा वापर झाल्यास बिलामध्ये दंड आकारला जातो.

याबाबत इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “क्युबिकल मल्टीपार्टी कनेक्शनधारकांनी काळजी करण्याची गरज नाही. परंतु पारंपारिक मल्टीपार्टी कनेक्शनधारकांनी वीज वापर २७ H.P. पेक्षा कमी ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांना वरील श्रेणीत सामील व्हावे लागेल.”

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा