जुन्या वादातून तरुणावर चाकू हल्ला
इचलकरंजी, दि. २३ –
शहरातील संदेश बारसमोर शनिवारी दुपारी जुन्या वादातून एका तरुणावर जीवघेणा चाकू हल्ला झाला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र मारुती कोंडेकर (३९, रा. गणेश नगर, शहापूर) हे दुपारी १२ ते १.३० दरम्यान संदेश बारमध्ये असताना आरोपी आप्पा कलढोणे (४०, रा. कोरोची) याने जुन्या वादातून भांडण केले. संतापाच्या भरात त्याने जवळील चाकूने कोंडेकर यांच्या पोटाच्या डाव्या बाजूस वार करून गंभीर जखमी केले.
जखमीला तातडीने आय.जी.एम. हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. दाखल अंमलदार स. फौ. आबिटकर असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खोत करीत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







