सलग दुसऱ्या वर्षी ‘गंगामाई’च्या मुलींची बाजी
इचलकरंजी –
जिल्हा क्रीडा कार्यालय, कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका आयोजित शालेय शासकीय 14, 17, 19 वर्षाखालील व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मुलींनी सलग दुसऱ्या वर्षी आपापल्या गटामध्ये अजिंक्यपद राखत प्रथम क्रमांक मिळवत यशाची पताका कायम ठेवली. या मुलींची सांगली येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या तिन्ही विजयी संघांना श्री ना.बा. एज्युकेशन सोसायटीचे प्रेसिडेंट श्रीनिवास बोहरा, चेअरमन कृष्णा बोहरा, व्हाईस चेअरमन उदय लोखंडे, ट्रेझरर महेश बांदवलकर, मानद सचिव बाबासाहेब वडिंगे, स्कूल कमिटी चेअरमन मारुतराव निमणकर, तसेच संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी व विश्वस्त यांचे मौलिक सहकार्य लाभले.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. ए. एस. काजी, पर्यवेक्षिका व्ही. एस. लोटके, पर्यवेक्षक एस. एस. कोळी, उपप्राचार्य व्ही. जी. पंतोजी यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. क्रीडा संघटक प्रा. शेखर शहा, क्रीडा अधिकारी संजय शेटे, उप क्रिडाधिकारी संजय कांबळे, सचिन खोंद्रे, आकाश माने व सर्व क्रीडा शिक्षक, पंच उपस्थित होते.
या खेळाडूंना प्राध्यापक शेखर शहा, जिमखाना प्रमुख बी एस माने, क्रीडा शिक्षक के. ए. पाटील व डी. डी. कोळी व सलीम मुजावर यांचे मार्गदर्शन लाभले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







