ॲड. दिनकर कुरकुटे यांचे आकस्मिक निधन
इचलकरंजी दि.२४ ऑगस्ट-
येथील न्यायालयात आपल्या कारकीर्दीची सुरुवात केलेले आणि सध्या मूळ गावी कसबे डिग्रज येथे वास्तव्यास असलेले फौजदारी क्षेत्रातील प्रथितयश वकील दिनकर नारायण कुरकुटे यांचे रविवारी पहाटे आकस्मिक दुःखद निधन झाले.
निधन समयी त्यांचे वय ७३ वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा, बहीण, भाऊ, नातवंडे असा मोठा परिवार आहे. गेल्या ४८ वर्षापासून इचलकरंजी त्याचबरोबर सध्या सांगली, कोल्हापूर, सातारा येथील न्यायालयात त्यांची प्रॅक्टिस सुरू होती. आपल्या कारकीर्दीत त्यांनी अनेक महत्वाचे खटले हाताळले आहेत. येथील मनोरंजन मंडळ या संस्थेचे ते संस्थापक संचालक होते. वकिली व्यवसायाबरोबरच सामाजिक क्षेत्रातही ते कार्यरत होते.
कै.ॲड.दि. ना. कुरकुटे
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







