ICHMH51NEWS.IN
9921600800

चौगुले स्वीट मार्ट अँड डेअरीच्या  वतीने मोदक महोत्सवाचे आयोजन 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

चौगुले स्वीट मार्ट अँड डेअरीच्या वतीने मोदक महोत्सवाचे आयोजन 

इचलकरंजी:
    येथील चौगुले स्वीट मार्ट अँड डेअरीच्या वतीने सर्व अभय शॉपी मध्ये यावर्षीही मोदक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सव निमित्त 26 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या या महोत्सवात तब्बल 30 हून अधिक प्रकारचे मोदक उपलब्ध होणार आहेत.
  चौगुले स्वीट मार्ट अँड डेअरी च्या स्वीट्स, डेअरी, बेकरी, नमकीन अशा उत्पादनाने ग्राहकांच्या मध्ये एक मोठा विश्वास निर्माण केला आहे. तब्बल 57 वर्षाची परंपरा असलेल्या चौगुले स्वीट मार्ट अँड डेअरीच्या वतीने  गणेशोत्सव निमित्त गेली पंधरा वर्षे मोदक महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. याच परंपरेप्रमाणे यावर्षीही मोदक महोत्सव होणार आहे. अभय शॉपीच्या सर्व शाखांमध्ये तसेच किरकोळ विक्रेत्यांच्याकडे हे मोदक उपलब्ध असणार आहेत.
  ग्राहकांच्या मागणीनुसार आणि पसंतीनुसार वेगवेगळ्या प्रकारचे मोदक उपलब्ध होणार आहेत. यामध्ये श्री च्या नैवेद्यासाठी मावा मोदक, मलई मोदक, काजू मोदक, खोबरा, उकडीचे मोदक, तळीव मोदक, खवा मोदक, मलई मोदक, चॉकलेट मोदक, स्ट्रॉबेरी मोदक, काजू मोदक, पिस्ता मोदक, पान मोदक, गुलकंद मोदक, मँगो मोदक, केसर मोदक, तांदळाचे मोदक, सीताफळ मोदक, मोतीचूर मोदक, गुळाचे मोदक, उकडी मोदक यासह तब्बल 30 पेक्षा अधिक प्रकारचे मोदक उपलब्ध होणार आहेत.
  या महोत्सव काळात ग्राहकांनी अवश्य भेट द्यावी असे आवाहन चौगुले स्वीट मार्ट अँड डेअरीच्या वतीने करण्यात आले आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा