ICHMH51NEWS.IN
9921600800

“उंच माझा झोका ग” अंतर्गत श्री काळामारुती महिला भक्त  मंडळातर्फे महिलांसाठी स्पर्धा व कार्यक्रम

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

“उंच माझा झोका ग” अंतर्गत श्री काळामारुती महिला भक्त मंडळातर्फे महिलांसाठी स्पर्धा व कार्यक्रम

इचलकरंजी ता. २५
पारंपारिक वेशभुषेतून घडणारे आपल्या सांस्कृतीचे दर्शन, उखाणासह विविध स्पर्धेत अव्वल येण्यासाठी लागलेली चढाओढ अन् झिम्मा फुगडीने धरलेलं रिंगण अशा अमाप उत्साहात श्री काळामारुती महिला भक्त मंडळाच्या वतीने नागपंचमी श्रावण मासनिमित्त विविध स्पर्धा पार पडल्या.
श्री काळामारुती आरती भक्त मंडळाचे संस्थापक, माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री काळामारुती महिला भक्त मंडळाच्या वतीने येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवन येथे उंच माझा झोका ग पारंपारिक मंगळागौरी सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये पारंपारिक वेशभुषा, उखाणे, मंगळागौरी पंचमी खेळ, लिंबू चमचा खेळ व घोडा खेळ, काठवट कणा व फुगडी प्रकार अशा विविध खेळ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचा शुभारंभ आमदार राहुल आवाडे व माजी वस्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला.
Advt
या स्पर्धेत शहर व परिसरातील महिलांसह मोठ्या संख्येने विविध ग्रुप सहभागी झाले होते. दुपारी १२ ते सायंकाळी ६ या वेळेत मराठा मंडळ सांस्कृतिक भवनमधील वातावरण महिलांच्या अमाप उत्साहात न्हाऊन गेले होते. उखाणा घेण्यासह स्पर्धेत अव्वल स्थान पटकविण्यासाठी महिलांमध्ये चांगलीच चढाओढ लागली होती. यामध्ये उखाणा स्पर्धेत मेघा हजारे, दिपाली लोके व शुभांगी माने यांनी, पारंपारिके वेशभुषा स्पर्धेत सुमन गुरुनानक, शुभांगी मुळे व स्नेहल सातपुते यांनी, मंगळागौर स्पर्धेत सोनचाफा ग्रुप, सखी ग्रुप व कल्पवृक्ष ग्रुप यांनी, उंच माझा झोका (डबल) मध्ये संध्या लायकर-काजल तोडकर, पुनम मिरगे-आशा मनोळे, शुभांगी लायकर-सारीका लायकर यांनी, उंच माझा झोका (सिंगल) मध्ये शोभा माने, स्वाती भांबुरे, आरती शिंदे व संजीवनी दिवटणकर यांनी, लिंबू चमचामध्ये सोनचाफा ग्रुप, पुनम कांबळे ग्रुप व रुपाली कोपार्ड ग्रुप यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून अपर्णा कुलकर्णी, सानिका लाड, अॅड. जिया शेख, सुवर्णा तिवारी, पूर्वा खोंद्रे यांनी काम पाहिले.
Advt
स्पर्धेनंतर विजेत्यांना माजी नगराध्यक्षा सौ. किशोरी आवाडे, सानिका आवाडे, भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा पुष्पाताई पाटील, अंजली बावणे यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी मंडळाच्या अध्यक्षा वैशालीताई गजगेश्वर, कार्याध्यक्षा शितल रेडेकर, उपाध्यक्षा मनीषा खोत, सेक्रेटरी सविता माने, रसिका गायकवाड, पुनमताई मिरगे, शारदाताई गजगेश्वर, छाया गोंधळी, संध्या लायकर, काजल तोडकर, सपना भिसे, सीमा कमते, नजमा शेख, अर्चना कुडचे, अश्विनी कुबडगे, रमा फाटक,  कावेरी सुभेदार तसेच संजय सातपुते, महादेव चौगुले महाराज, सुभाष तोडकर, श्रीकांत टेके आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

पारितोषिक वितरण करताना सौ किशोरी आवाडे,सानिका आवाडे,रमा फाटक,नजमा शेख

दीपप्रज्वलन करताना माजी मंत्री प्रकाश आवाडे,श्रीकांत टेके

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा