ICHMH51NEWS.IN
9921600800

अर्णव धूतचा ड्रम वादनात भारतात प्रथम क्रमांक

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

अर्णव धूतचा ड्रम वादनात भारतात प्रथम क्रमांक

इचलकरंजी – राजेश बांगड

कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी युवा संघटनामार्फत आयोजित सरगम २०२५ या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये येथील अर्णव आशिष धूत याने उल्लेखनीय यश मिळवले आहे.

Advt

२१ जून रोजी नाट्यगृह येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत एकल वाद्ययंत्र (ड्रम) वाजवण्यात अर्णवने (वयोगट ७ ते १४) प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर राज्यस्तरीय फेरी २ व ३ ऑगस्ट रोजी पुणे येथील गणेश कला क्रीडा येथे पार पडली. या ठिकाणीही अर्णवने पुन्हा प्रथम क्रमांक पटकावला.

त्यानंतरची अखिल भारतीय फेरी २३ व २४ ऑगस्ट रोजी हैदराबाद येथे झाली. येथे देशभरातील स्पर्धकांना मागे टाकत अर्णव धूतने पुन्हा एकदा प्रथम क्रमांक मिळवला. त्याच्या या यशामुळे कोल्हापूर जिल्हा तसेच माहेश्वरी समाजाचा लौकिक संपूर्ण भारतभर उंचावला आहे. अर्णवच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा