इचलकरंजीत गणरायाचे उत्साहात आगमन
इचलकरंजी:
इचलकरंजी शहरात आज गणरायाचे पारंपारिक जल्लोषात स्वागत करण्यात आले. ढोल-ताशे, झांज-लेझीम अशा पारंपारिक वाद्यांच्या गजरात गणपती बाप्पाचे आगमन झाले. घराघरात तसेच विविध मंडळांमध्ये गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना मोठ्या भक्तिभावाने करण्यात आली.
घरगुती मुर्ती
पारंपरिक वाद्य
बाजरपेठेत गर्दी
अमाप उत्साह
कौटुंबिक उत्सव
संस्कृती जपणूक
या स्वागत सोहळ्यात अबालवृद्धांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण गणेशोत्सवाच्या तयारीत आणि स्वागताच्या आनंदात सहभागी झाले. शहरातील बाजारपेठांमध्येही मोठी लगबग पाहायला मिळाली. सजावटीचे आकर्षक साहित्य, लाइटिंग, फुलांची आरास यामुळे बाजारपेठा रंगतदार झाल्या आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर उलाढाल होत असून व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले आहे.
संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण असून, गणेशोत्सवाची पर्वणी साजरी करण्यासाठी सर्वत्र भक्ती व आनंदाची लहर पसरली आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800













