दि इचलकरंजी बार असोसिएशनतर्फे न्यायाधिशसो रोटे साहेब यांचा सत्कार
इचलकरंजी
इचलकरंजी येथे कार्यरत दिवाणी न्यायाधिशसो, वरिष्ठ स्तर मा.श्री. आर.एस. रोटे साहेब यांची अॅडहॉक जिल्हा न्यायाधिशपदी पदोन्नती होऊन हिंगोली येथे त्यांची बदली झालेने दि इचलकरंजी बार असोसिएशनचे वतीने मा.श्री. आर.एस. रोटे साहेब यांचा सत्कार करणेत आला. यावेळी दिवाणी न्यायाधिशसोो, वरिष्ठ स्तर मा.श्री. जी.एम. नदाफ साहेब उपस्थित होते.
Advt
दि इचलकरंजी बार असोसिएशनचे वरिष्ठ वकील अॅड. एस. बी. सावेकर, अॅड. इरफान जमादार, अॅड. व्ही. बी. चव्हाण व अॅड. ए.टी. तांबे यांनी मनोगत व्यक्त केले. मा. न्यायाधिशसो श्री. जी.एम. नदाफ साहेब यांनी वकिलांना अधिकाधिक कामे चालविणेचे आवाहन करीत मा. न्यायाधिशसो रोटे साहेब यांचे सोबतचे अनुभव सांगितले. यावेळी वरिष्ठ वकिल अॅड. बी.ए. देसाई (रेंदाळ) व अॅड. अजितराव कुलकर्णी साहेब यांचे हस्ते मा.श्री. आर.एस. रोटे साहेब यांचा सत्कार करणेत आला. सत्कारास उत्तर देताना मा.श्री. आर.एस. रोटे साहेब यांनी दि इचलकरंजी बार असोसिएशनचे सर्व वकीलांची प्रशंसा करताना सर्व वकील काम चालविणेस उत्सुक असलेचे सांगितले. अल्पावधीत आपले न्यायालयीन कामकाजाचा इचलकरंजी मध्ये ठसा उमटविलेले मा. श्री. रोटे साहेबांचे अभिनंदन करीत दि इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राजगोपाल रामानंद तोष्णीवाल यांनी न्यायाधिशसोो श्री. रोटे साहेबांची खंडपीठ चळवळीमधील सहभागाचा विशेष उल्लेख केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महिला प्रतिनिधी अॅड. दिपाली हणबर यांनी केले.
यावेळी दि इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राजगोपाल रामानंद तोष्णीवाल, उपाध्यक्ष अॅड. राजाराम सुतार, सेक्रेटरी अॅड. अभिजीत माने, जॉ. सेक्रेटरी अॅड. आदित्य मुदगल, खजिनदार अॅड. विजय शिंगारे, महिला प्रतिनिधी अॅड. दिपाली हणबर, कार्यकारिणी सदस्य अॅड. महेश कांबळे, अॅड. राहुल काटकर, अॅड. शैलेंद्र रजपूत, क्लार्क प्रविणभाऊ फगरे व दि इचलकरंजी बार असोसिएशनचे सर्व सदस्य उपस्थित होते.
फोटो-
मा. न्यायाधीश रोटे साहेब सत्कारास उत्तर देताना.
सोबत मा. न्यायाधीश नदाफ साहेब व अध्यक्ष राजगोपाल तोष्णीवाल.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







