ICHMH51NEWS.IN
9921600800

डिकेएएससी समोरील दिशादर्शक कट्टा पडून रहदारीला धोका

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

डिकेएएससी समोरील दिशादर्शक कट्टा पडून रहदारीला धोका.व्हिडीओ 

https://youtube.com/shorts/FDW6OcuKfz8?si=5_GF2ofsMryCMB5t

 

इचलकरंजी :
ए.एस.सी. कॉलेज रोडवरील पूजा टायर समोर असलेला डिव्हायडरलगतचा दिशादर्शक गोल कट्टा निघून पडल्याने रहदारीला गंभीर धोका निर्माण झाला आहे.

याबाबत स्थानिक नागरिक हरीश सोमाप्पा देवाडिगा (रा. टिळक रोड, इचलकरंजी) यांनी प्रशासनाकडे तक्रार नोंदवली आहे. याआधीही अज्ञात वाहनाच्या धडकेत हा कट्टा पडला होता. त्यावेळी नागरिकांच्या मदतीने तात्पुरता बसविण्यात आला होता. परंतु वाढत्या वाहतुकीमुळे तो पुन्हा निघून पडला आहे.

या मार्गावर दिवसभर मोठ्या प्रमाणात रहदारी असते. त्यामुळे विद्यार्थी, दुचाकीस्वार आणि नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. सदर दिशादर्शक कट्टा तातडीने बसविण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा