जनसेवा गणेशोत्सव मंडळ, नदीवेस पर्यावरण पूरक गणेश उत्सव
इचलकरंजी
गेली ६६ वर्षापासून इचलकरंजीतील जनसेवा मंडळाने एक पर्यावरण पूरक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचा उपक्रम राबवला आहे मंडळाकडून शाडू मातीची गणेश मूर्ती प्रतिष्ठापना केली जाते मूर्ती कोणत्याही साच्याचा वापर न करता केवळ कुंभारांच्या हस्त कौशल्य द्वारे बनवली जाते,
*एक गणेश मूर्ती एक कुंभार या तत्त्वानुसार मूर्ती अद्वितीय दिसते.
नदीवेस जनसेवा मंडळाचे स्थापना लक्ष्मण जामदार आणि सहकाऱ्यांनी १९५९ मध्ये केली सामाजिक उपक्रमाबरोबरच शिवजयंती उत्सव गणेश उत्सव व विविध धार्मिक उत्सव सण उत्साह साजरे केले जातात आनंद चतुर्थी दिवशी पूर्वी बैलगाडीसह मंडळाची मिरवणूक निघत असे व त्या मिरवणुकीमध्ये समाज प्रबोधनात्मक देखावे सादर केले जात असे हीच परंपरा माजी नगरसेवक संपतराव जामदार सुभाष नाईक बाबुराव कवडे उत्तम जामदार आदींनी निष्ठेने जोपासली
मंडळाला पोलीस प्रशासनाच्या वतीने शांतता मिरवणूक गणराया अवॉर्ड मिळाला आहे व तसेच विविध संस्था यांचे सुद्धा पारितोषिक मिळाले आहेत, हे गणेश मूर्ती
विक्रम नगर मधील *बी टी उर्फ दत्तात्रय कुंभार* हे मूर्ती साकारतात व कोणत्याही साच्याचा वापर न करता केवळ हस्त कौशल्यातून गणेश मूर्ती करण्यात येते मातीच्या गणेश मूर्तीच्या वापरामुळे गणेशोत्सव आत पर्यावरणाची हाणी कमी होते व उपक्रमात नागरिकांतून प्रतिसाद मिळतो मंडळाच्या मातीच्या मूर्ती देण्यासाठी अनेक जण पुढे येत असल्याने
चिट्ट्या टाकून पुढील बारा वर्षेचे बुकिंग केले आहे
नदी वेस जनसेवा गणेशोत्सव मंडळ चे अध्यक्ष श्री अजित पाटील उपाध्यक्ष श्री शुभम पाटील सेक्रेटरी श्री जयंत जामदार खजिनदार बंडू उर्फ श्री प्रताप जामदार व अमर नाईक हे यावर्षी गणेशोत्सवाचे काम पाहत आहेत व त्यांना सर्व कार्यकर्त्यांची साथ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मिळत आहे
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







